अभावी ग्रामीण भागातील युवकांच्या  रोजगारासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज
वडगाव मावळ:
पुणे मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला मावळ तालुका त्यामधील ग्रामीण भागातील  टाकवे बुद्रुक औद्योगिक वसाहत या ठिकाणी अनेक लहान मोठ्या कंपन्या उदयास आल्या. मात्र काही असुविधांच्या अभावी येथील कंपन्या स्थलांतरित होऊ लागल्याने युवकांच्या हाताचा रॊजगार गेला . 
दरम्यान टाकवे बुद्रुक येथे पंचवीस वर्षापूर्वी अनेक कंपन्या  आल्या त्यानंतर आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ,  अनेक युवकांना रोजगार उपलब्ध झाला . परिणामी युवकांना कायमस्वरूपी कंपनीमध्ये नोकरी उपलब्ध झाली असताना अचानक सात ते आठ वर्षापूर्वी येथील तीन मोठाल्या कंपन्यानी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला.  परिणामी येथील कंपन्या स्थलांतरित होत असताना जवळपास नऊ ते दहा हजार युवकांचा रोजगार गेला
त्या दरम्यान कंपन्यांमधून युनियन होऊ घातल्या परिणामी कंपनी व कामगार यांच्यामध्ये संघर्षाच्या ठिणग्या पेटू लागल्या.
या काळात कामगारांनी कंपन्या स्थलांतरित होऊ नये म्हणून अनेक राजकीय नेत्यांना ह्या मध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आणले असता, त्यांनी भूमीपुत्रांना अनेक आश्वासने दिली मात्र ती आश्वासनेच राहून गेली.  तसेच या कंपन्यांवरती आधारित असणारे अनेक छोटे उद्योजक व छोटे वर्कशॉप बंद पडले,
राजकीय नेते सदर कंपन्या स्थलांतरित होण्यापासून थांबू शकले नाही, परिणामी युवकांच्या हाताचा रोजगार बुडाल्याने अनेक कुटुंबांची वाताहात झाली.
परिणामी मावळ मधील अनेक युवकांना आपले कुटुंब  स्थलांतरित करून पुणे मुंबई सारख्या शहरी भागाचा आश्रय घ्यावा लागला आहे. शेहरी भागांमध्ये हाताला मिळेल ते काम करण्यास युवकांनी सुरुवात केली. येथील कंपन्या स्थलांतरित होण्यास नक्की जबाबदार कोण ? असा संशिप्त प्रश्न या युवकांच्या गेलेल्या रोजगारामुळे उपस्थित होत आहेत.
••या आहेत मुख्य समस्या…
कान्हे येथे रेल्वे ओव्हरब्रिज नसल्याने रेल्वे क्रॉसिंग मुळे या भागातून कंपन्यांचा होणारा ट्रान्सपोर्ट व कंपन्यांमध्ये येणारे कामगार त्यांना होणारा विलंब. यामुळे  औद्योगिक वसाहत मधील कंपन्यावरती आधारित असणाऱ्या कंपन्यांना वेळेवरती प्रोडक्शन माल न मिळाल्याने त्या कंपन्यांनी या  सबंधित माल  पुरवणाऱ्या कंपन्यांना भरमसाठ डेबिट मारल्यामुळे येथील  कंपनींचे अतोनात नुकसान होत होते..
  रेल्वे ओव्हरर्ब्रीजेची मागील काही वर्षांपासून अनेक वेळा उद्घाटने झाली, परंतु अध्याप परस्थिती जैसे थे कायम आहे.
••  टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याने अवजड वाहनास करण्यात आलेली बंदी..
•• काही स्थानिकांचा कंपनी व्यवस्थापनांना दमदाटी करून  ठेकेदारी मिळवण्यासाठी चाललेला प्रयत्न.
••  विविध मंडळांकडून सण, जयंती, उस्तव आल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाकडून वर्गणी घेणे.
•• स्थानिक ग्रामपंचायती कंपन्यांकडून टॅक्स घेण्यासाठी आग्रेसर  मात्र ग्रामपंचायतीकडून सदर कंपनीना कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून त्या संबंधित विभागावरती नाराजीचे सूर आहे.
•••औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांसाठी या सुविधाची आवश्यकता आहे..
•• कंपन्यांना आवश्यक असणारे पाणी पुरवठा योजना होणे अत्यावश्‍यक..
•• लाईटची लपंडाव नेहमी सुरू असतो त्या ठिकाणी लाईट सुरळीत होणे अत्यावश्यक..
••मुख्य रस्त्यापासून कंपन्यांना जाणारे अंतर्गत रस्ते व्यवस्थित असणे गरजेचे आहेत…
•• रस्त्यांपासून कंपनीपर्यंत जाईपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्टेट लाईट असणे आवश्यक आहे…
••  कंपन्यांच्या अंतर्गत रस्त्यांना सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे.
••  कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागात पोलिस चौकी कार्यरत असणे आवश्यक आहे..
•• छोटाल्या कंपन्यांमधून अग्नी सुरक्षा नसल्यामुळे या ठिकाणी  फायर  ब्रिगेडचे स्टेशन असणे गरजेचे आहे..
दरम्यान या अनुषंगाने सेवा फाउंडेशन व आंदर मावळ्याच्या  जनतेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात होते. परिणामी टाकवे येथील इंद्रायणी नदी वरील पुलाला मंजुरी  मिळाली असून काम प्रगती पथावरती सुरु आहे..
कान्हे फाटा येथील रेल्वे ओव्हरब्रिजचा परवानगी मिळालेली आहे. मात्र याठिकाणी अध्याप कामास सुरुवात झालेली नाही त्यामुळे कान्हे फाटा येथील रेल्वे क्रॉसिंग समस्या कायमस्वरूपी आजून तशीच  आहे..
लोकप्रतिनिधींनी या उपाय योजना करणे गरजेचे आहे.
ज्या कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत त्या ठिकाणी नवीन कंपन्या आणण्यासाठी  प्रोस्ताहन  देणे गरजेचे आहे.. औद्योगिक वसाहतीला एमआयडीसीचा दर्जा देऊन या ठिकाणी जागा भूसंपादन करून एमआयडीसी सुरू करण्यात यावी.
येथील मुख्य रस्त्यालगत अनेकानी जमिनी खरेदी करून घेतल्या आहेत, मात्र त्या ठिकाणी काहीही होत नसल्याने रोजगार व  उत्पन्नाचे साधन अडकून पडले आहे. त्यामुळे या भागात एमआयडीसी होणे गरजेचे आहे.  यासाठी विधानसभा व राज्यसभे मध्ये लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे गरजेचे आहे.  टाकवे बुद्रुक या ठिकाणी एमआयडीसी सुरू झाल्यास शंभर ते दीडशे गावातील भूमी पुत्रांना रोजगार उपलब्ध होईल.

error: Content is protected !!