वडगाव  मावळ:
वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी  मागणी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केली.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी भेट घेऊन निवेदन देऊन ही मागणी केली. खासदार बारणे यांची भेट घेऊन शहरातील विविध विकास कामांसदर्भात तील निधी बाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती नगराध्यक्ष ढोरे यांनी दिली.
वडगाव व  कातवी परिसर मधील विविध विकासकामांसाठी एकूण १५ कोटी रुपयांची विविध विकासकामे पुणे नियोजन समितीच्या तसेच नगरविकास खाते मुंबई च्या माध्यमातून निधीची मागणी केली असता खासदार बारणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर करण्यासंदर्भात आश्वासन दिले असल्याचेही नगराध्यक्ष ढोरे म्हणाले.

error: Content is protected !!