नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून १ कोटी १८ लक्ष रुपयांतून वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सतरा मधील विविध विकास कामांना सुरूवात
वडगाव मावळ:
आमदार सुनील शेळके यांच्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान फंडातून व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मध्ये गेल्या महिन्यात सुमारे १ कोटी १८ लक्ष* रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.
गेल्या दहा दिवसांपासून खालील भागातील कामांना प्रत्यक्ष सुरूवात झाली असून संबधित विकासकामे प्रगतीपथावर आहेत. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी सद्य स्थितीतील कामाची पाहणी केली तसेच संबधित ठेकेदार यांना काम चांगल्या प्रकारे करण्यासंदर्भात काही महत्वाच्या सूचना देखील केल्या.
साखळी रोड लगत असलेल्या सिद्धार्या बिल्डींग ते प्रथमेश अपार्टमेंट ते आंनदी वास्तु ते रामदास ढोरे ते ढमढेरे यांच्या घरापर्यंत सुमारे ५६ लक्ष ३४ हजार रुपये इतक्या खर्चातून रस्ता काँक्रिटीकरण करणे कामास सुरुवात करण्यात आली आहे.
तसेच याव्यतिरिक्त या शेजारील परिसरात सुमारे २९ लक्ष ३४ हजार खर्चातून मोरे डेअरी ते शिवआंगण अपार्टमेंट रस्ता कॉक्रीटीकरण करण्यात येत आहे तसेच ३२ लक्ष ८४ हजार रुपयांतून गिरी पोल्ट्री ते मोरया काॅलनी परिसरातील रस्ता कॉक्रीटीकरण करण्यात येत आहे.
खूप दिवसांपासूनचा रस्त्याचा विषय मार्गी लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
तसेच येणाऱ्या काळात या परिसरातील मुख्य रस्ता असलेला वडगाव साखळी रोड ते पैसाफंड रोडचे काम प्रशासकीय कारवाईत असून लवकरच संबधित रस्त्याच्या कामास येत्या काही महिन्यांत सुरूवात होईल असे आश्वासन नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी या भागातील नागरिकांना दिले.

error: Content is protected !!