वडगाव मावळ:
कायदेविषयक व सामाजिक कार्याबद्दल मला आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळाले…पण  कै. अ‍ॅड. शलाका विधीरत्न भूषण  पुरस्कार स्विकारताना मी पहिल्यांदा भावूक झाले…कै.अँड शलाका हिने दोन वर्षाच्या कायदेच्या प्रॅक्टिस मध्ये मोठे नाव कमावले..तिची न्यायाधीश होण्याची इच्छा अपुरी राहिली….मी तरूण वकील मुलींना आवाहन करते की, शलाकाचे अपुरी राहिलेली इच्छा तुम्ही पुर्ण करा हीच कै.अ‍ॅड शलाकाला श्रद्धांजली ठरेल  असे भावनिक आवाहन अँड.निलिमा खिरे यांनी केले.
कै. अ‍ॅड. शलाका विधीरत्न भूषण  पुरस्काराने अ‍ॅड. निलिमा खिरे सन्मानित करण्यात त्या वेळी खिरे बोलत होत्या. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि वडगाव मावळ बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमात कै. अ‍ॅड. कु. शलाका विधीरत्न भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. निलिमा खिरे बोलत होत्या.
अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या न्यायाधीश सौ. छाया उमरेडकर व रोटरी एमआयडीसीचे संस्थापक रो. संतोष खांडगे, अध्यक्ष रो. विन्सेंट सालेर, बार असोसिएशनचे अध्यक्ष रो. अ‍ॅड. मच्छिंद्र घोजगे यांच्या प्रमुख उपस्थितीत खिरे यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
पुरस्कारप्राप्त अ‍ॅड. निलिमा खिरे या कायदा क्षेत्रात गेली ४०  वर्षाहून अधिक काळ  कार्यरत असून सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक कार्यात सक्रिय आहेत. लोणावळा एज्युकेश ट्रस्टच्या त्या विश्वस्त असून विद्यार्थी कल्याणाचे, अन्यायग्रस्त महिलांना मार्गदर्शनाचे विविध उपक्रम त्या राबवित आहेत. आजवर त्यांना विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहे.
यावेळी रोटरीचे उपाध्यक्ष रो. राहुल खळदे, सचिव रो. मिलिंद शेलार, प्रकल्पप्रमुख रो. सुवर्णा मते, रो. दशरथ जांभुळकर व सर्व सदस्य तसेच बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश पवार, सचिव अ‍ॅड. हेमंत वाडेकर व सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
न्यायाधीश सौ.छाया उमरेडकर म्हणाल्या,” रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम आय डी सी ने वडगाव मावळ बार असोसिएशन च्या सहकार्य ने अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम सुरू करून योग्य व्यक्तीस पुरस्कार दिला त्याबद्दल दोन्ही संस्थेचे मी अभिनंदन करते.
समारंभाचे अध्यक्ष न्यायाधीश श्री.व्ही.डी.निंबाळकर म्हणाले,” माझ्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत दिवंगत कायदेतज्ज्ञ व्यक्तीच्या नावाने कोटाॅच्या आवारात पहिल्यांदाच पुरस्कार समारंभ मी पहात आहे.या पुरस्कारामुळे तरूण वकिल वर्गाला चांगले प्रोत्साहन मिळणार आहे.कै.अ‍ॅड शलाका हिने आपल्या छोटास्या कायदेविषयक कारकीर्दीत मोठे नाव प्राप्त केले.तिच्या कुटुंबाने व रोटरी क्लब ने तिचे नाव चिरंतन राहावे म्हणून सुरू केलेल्या पुरस्काराबद्दल मी त्यांचे कौतुक करतो . पहिला पुरस्कार प्राप्त अ‍ॅड. निलिमा खरे यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.
रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम आय डी सी तर्फे वडगाव मावळ बार असोसिएशनच्या ग्रंथालय साठी पंचवीस हजार रूपयाचा धनादेश देणगी स्वरूपात देण्यात आला.समारंभाचे सूत्रसंचालन रो.लक्ष्मण मखर व रो.अनिल धर्माधिकारी यांनी केले.अ‍ॅड.सुधा शिंदे यांनी आभार मानले.पसायदान ने कार्यक्रमाची  समारंभाची सांगता झाली.

error: Content is protected !!