पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान
वडगाव मावळ:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि आदार्श बालक मंदिर,व ज्ञानदेव बालक मंदिर शिवनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने  शिवनगरी परिसरातुन पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले.डॉ.मोहन गायकवाड यांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगितले.
विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा म्हणुन आवाहन केले गणेशोत्सव सजावटीसाठी प्लॕस्टीकचा वापर टाळा,सजावटीसाठी थर्माकोलचा वापर टाळा,गणेशमुर्ती शाडूमातीचीच घ्यावी,प्लास्टर आॕफ पॕरिसचा वापर टाळा,गणेशमुर्ती शक्यतो लहान आकाराची घ्यावी,सजावटीसाठी प्लॕस्टीक फुलांचा वापर टाळा,गणेश विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करा असे आवाहन केले.
*निसर्गाचा नाश म्हणजे मानवजातीचा नाश*
*कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी*
*पर्यावरण का रखे ध्यान,तभी बनेगा देश महान*
अशा घोषणा देऊन जनजागृती केली संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड तसेच मुख्याध्यापक:-विनोद मुळके
शिक्षक:- विद्या काळे, प्रदीप नागरगोजे, आनंद कुमदाळे, माधुरी कुंजीर, सरला पाटील, माधुरी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली यामध्ये उपाध्यक्ष शब्बीर मुजावर,खजिनदार मनोहर कड,प्रो.सुभाष चाटे,प्रो.मारुती शेलार,प्रभाकर मेरुकर,स्वप्निल सुतार,सतीश उघडे,विलास चोळसे,मच्छिंद्र राजगुरव आणि विद्यार्थी सहभागी झाले होते .
हे अभियान ३०/८/२२ पर्यंत प्रत्येक प्रभागातून राबविले जाणार आहे तसेच शाळा कॉलेज महाविद्यालयातूनही राबविले जाणार आहे.

error: Content is protected !!