वडगाव मावळ:
मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची प्रगती कौतुकास्पद  असल्याचे गौरवोद्गार माजी उपसभापती शांताराम कदम यांनी काढले. मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ॲड पु. वा. परांजपे विद्या मंदिर तळेगाव पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण असवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी माजी सभापती शांताराम कदम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव भेगडे, मुख्य प्रवर्तक धनंजय नांगरे, सल्लागार भाऊसाहेब आगळमे, कार्यकारी संचालक राम कदमबांडे खजिनदार‌ भाऊसाहेब खोसे उपाध्यक्ष सुमन जाधव संचलिका वैजयंती कुल, परांजपे शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे,रोहन पंडित, लक्ष्मण सातकर, दिलीप पोटे, धनकुमार शिंदे, अमोल जाधव,स्नेहल बाळसराफ, उद्योजक संदिप पवार,संजय गाडे, संपकाळ  सर , विकास ताजणे,माजी मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे, बबनराव तांबे, चंद्रशेन बनसोडे, बाबाराव अंभोरे, मधुकर गुरव, पांडुरंग शिंदे शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष संजय कासाबी संस्था पदाधिकारी सभासद उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात नारायण असवले म्हणाले की, पतसंस्थेनी स्थापनेपासून प्रगतीचा दिशेने वाटचाल केली असून पतसंस्था लवकर स्वतच्या मालकीच्या कार्यालयात जाणार आहे
यावेळी पतसंस्थेच्या सनदी लेखापरीक्षक विजया आगळमे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक शरद देशपांडे,   सेवानिवृत्त सभासद, इयत्ता दहावी बारावी मध्ये उज्वल या संपादन करणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा
चा सत्कार करण्यात आला.
मावळ तालुक्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांसाठी ही महत्वाची पतसंस्था आहे पतसंस्थेला एकूण निव्वळ नफा १३ लाख ७२ हजार १५६ एवढा झाला असुन सभासदांना ८ टक्के
पतसंस्थेच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे कार्यकारी संचालक राम कदमबांडे यांनी केले, सुत्रसंचालन वैजयंती कुल व सुमन जाधव यांनी केले तर आभार भाऊसाहेब खोसे यांनी मानले.

error: Content is protected !!