वडगाव मावळ:
शहराला जोडणा-या ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदीकरण करणे गरजे बनले आहे,अरूंद रस्यावरून प्रवास करताना वाहन चालकांची दमछाक होत आहे. शिवाय प्रवास करणा-या नागरिकांची गैरसोय होत आहे.
मावळ तालुका जगाच्या नकाशावर आहे,हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण,शहरी भागातील  दळणवळणाच्या सोयी यामुळे तालुक्यात नागरीकरण वाढले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामीण भागातील पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहे.
आंदर मावळाला शहराशी जोडणा-या फळणे फाटा ते खांडी आणि कल्हाट फाटा ते सावळा या रस्त्याने शेकडो पर्यटकांचे येणे जाणे सुरू आहे.
या शिवाय या भागातील फळणे,माऊ,दवणेवाडी,माऊ,मोरमारेवाडी,गभालेवाडी,डोगरवाडी,सटवाईवाडी,वडेश्वर,लष्करीवाडी,शिंदेवाडी,घाटेवाडी,नागाथली,कुसवली,वहानगाव,बोरवली,कांब्रे,डाहुली,बेंदेवाडी,चिरेखान,कुसूर,मोरमारेवाडी,खांडी,निळशी तील ग्रामस्थ खांडी वरून फळणे फाटा मार्गे वडगाव मावळाला येतात,तर सावळा,आढारवाडी,गोंटेवाडी,ढोंगेवाडी,कळकराई,माळेगाव बुद्रुक,पिंपरी,माळेगाव खुर्द,कुणे,अनसुटे,मानकुली,पारीठेवाडी,इंगळूण,किवळे,कशाळ,भोयरे,कोंडिवडे,कल्हाटचे गावकरी भोयरे मार्गी फळणे फाट्यावरून वडगाव कडे येत आहेत. अथवा निगडे मार्गे तळेगाव औद्योगिक क्षेत्रात जात आहे. ग्रामीण भागातील हे दोन्हीही रस्ते अंरूद आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाची गरज बनली.आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून रस्ता रुंदीकरण साठी काही प्रमाणात निधी मिळाला असून हे काम पूर्ण करण्यासाठी अधिक निधीची गरज आहे.

error: Content is protected !!