राज्यस्तरीय फायर आर्म कॉम्पिटीशन स्पर्धेत मावळातील ग्रामीण भागातील स्पर्धकांचे विशेष गुण
वडगाव मावळ:
वरळी मुंबई येथे झालेल्या  महाराष्ट्र राज्य राज्यस्तर फायर आर्म कॉम्पिटिशन स्पर्धा पार पडल्या. ५० मीटर प्रोन प्रकार मध्ये  नेमबाजी मध्ये  मावळातील तीन जणांनी  यश संपादन केले.
  ५० मीटर रायफल प्रकारात ऊर्से येथील नवनित विकास ठाकुर याने ज्युनिअर गटामध्ये ६०० पैकी ५०७  गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला. तसेच आढले  बुद्रुक येथील सार्थक बाळासाहेब घोटकुले व उत्कर्ष सोनी या मावळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विषेश गुण संपादन केले.त्यांची गुजरात येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी. व्ही. माळवणकर या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    प्रशिक्षक  राज दाभाडे आणि स्नेहल पाटील यांच्या प्रशिक्षणाखाली बालेवाडी श्री शिव छत्रपती  स्पोर्ट कॉम्प्लेक्स प्रशिक्षण घेत असून  गुणसंपादन केले आहे. यांना  आई वडील आणि शाळेचे मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण भागातील मुलांनी रायफल फायर या अनोख्या व शहरी क्रीडा प्रकारात यश संपादन करुन मावळचे व आपल्या गावचे नाव रोशन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कैतुक होतं आहे.

error: Content is protected !!