
महागाव:
हॅण्ड इन हॅण्ड इंडिया, तळेगाव (दाभाडे), व फिंचम इंडिया (CSR) यांच्यामार्फत उपजीविका व पर्यावरण संवर्धन केंद्रित हरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागाव गावातील शेतकरी फळबाग लाभार्थ्यांसाठी फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश हा महागाव गावातील शेतकरी लाभार्त्यांना फळबाग लागवड पद्धती, खड्डा भरणे, खतांचा वापर, तण व्यवस्थापन, कीड आणि रोग व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन, सेंद्रिय खत तयार करणे, सिंचन व्यवस्थापन आणि छाटणी पद्धती माहिती असणे त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करणे असा होता.
दिलीप पाटीदार, अभिजीत अब्दुले व ओमकार कुलकर्णी यांनी वृक्ष संगोपन व फळबाग व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी महागाव गावचे सरपंच सोपान सावंत, उपसरपंच स्वाती भैरट, ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून दिलीप पाटीदार, अभिजीत अब्दुले, ओमकार कुलकर्णी, पंढरीनाथ बालगुडे व अश्विनी खराडे इत्यादी उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


