वडगाव मावळ:
येथील युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष विकी भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव केशवनगर येथील गोपाळराव देशपांडे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना कडधान्य आणि खाऊचे वापट करण्यात आले.
तसेच वडगाव शहरातील सर्पमित्र नंदकिशोर कासार (मुक्या) यांच्या मुलीच्या कुंकुमतिलक कार्यक्रमासाठी भाजीपाला भेट देण्यात आला.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत विकी भोसले आणि मित्रपरिवाराच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.यावेळी विकी भोसले, यशवंत शिंदे, माऊली गायकवाड विजय फाटक, श्रेयस घारे, शुभम भराडी, बंटी उडापे, सोनू मोहिते, विश्वास सुपेकर, सागर मोढवे वसतिगृहातील शिक्षक, विद्यार्थी आणि मित्र परिवार उपस्थित होते.विकी भोसले यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक होत असून इतरांनी अनुकरण करावा असा हा उपक्रम असल्याच्या भावना यशवंत शिंदे यांनी व्यक्त केल्या.

error: Content is protected !!