महागाव:
हॅण्ड इन हॅण्ड इंडिया, तळेगाव (दाभाडे), व फिंचम इंडिया (CSR) यांच्यामार्फत महागाव गावातील शेतकरी लाभार्थ्यांना 1000 (केशर)आंबा रोपे वाटप करण्यात आले.
आंबा रोपे वाटप कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्याचे अतिरिक्त उत्पन्न वाढविने, कार्बन उत्सर्जन नियंत्रण  व जमिनीची धूप कमी  करणे असा आहे.
या कार्यक्रमात दिलीप पाटीदार व अभिजीत अब्दुले यांनी आंबा रोपांचे  संगोपन व व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी महागाव गावचे सरपंच सोपान सावंत, उपसरपंच स्वाती भैरट व इतर ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आंबा रोपे वाटप कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून दिलीप पाटीदार, अभिजीत अब्दुले, मोहन सोनवणे, मनीषा कारके व अश्विनी खराडे उपस्थित होते.

error: Content is protected !!