भारतीय जनता पार्टीच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी मोहन वाघमारे यांची निवड
कामशेत:
मावळ तालुका  भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी कामशेत येथील मोहन दिनकर वाघमारे यांची निवड करण्यात आली. मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या हस्ते  वाघमारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी वाघमारे यांची निवड केली.
या वेळी मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे ,शंकर शिंदे ,विजय शिंदे वसंत काळे,गणपत शिंदे,डॉ.सचिन नागोत्रा, गणपत ठोसर, राजू कदम  उपस्थित होते. वाघमारे यांनी यापूर्वी कामशेत शहराध्यक्ष पद भूषविले होते.
पक्ष संघटना बळकटी साठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास वाघमारे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!