कामशेत:
कोथुर्णेतील स्वरा चांदेकरच्या हत्येने संपूर्ण मावळ तालुका हळहळला. स्वराच्या हत्येची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मावळातील गावोगावचे तरूण खडबडून जागे झाले आहे. लेकींच्या सुरक्षिततेबाबत गावक-यांनी पाऊले टाकायला सुरुवात केली आहे.यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सीसीटीव्हीची नजर ठेवली जाणार आहे.
मावळ तालुक्यातील ब्राम्हणवाडी (बऊर) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामस्थांच्या स्वखर्चाने सीसीटीव्ही  कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले. कोथुर्णे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तानाजी शिखरेसर यांच्या मागणीनुसार ब्राम्हणवाडी (बऊर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळ तालुका संघटक सतिश वाळुंजकर ,विद्येमान ग्रामपंचायत सदस्या अश्विनी कृष्णा दळवी यांचे पती उद्योजक कृष्णा दळवी, तसेच मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळ तालुका युवक राष्ट्रवादीचे सचिव  मारूती दळवी, विजय दळवी यांनी स्वखर्चाने शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण केले.
  त्याप्रसंगी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक  सतिश वाळुंजकर, विद्येमान ग्रामपंचायत सदस्य कृष्णा दळवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव  मारूती दळवी,विजय दळवी,शाळेचे मुख्याध्यापक तानाजी शिखरेसर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व ब्राम्हणवाडी बऊर गावाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष वाळुंजकर,मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष  गणेश वाळुंजकर ,मावळ भूषण किर्तनकार ह.भ.प.मधुकरमहाराज गराडे, शालेय शिक्षण समितीचे सदस्य श्री खंडू चव्हाण पै.दिनेश अंकुश म्हस्के उपस्थित होते.
  मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर म्हणाले,” स्वराच्या हत्येने मावळ तालुक्यातील प्रत्येक आई वडीलांचे काळीज चिरले,स्वराची हत्या अत्यंत दुर्देवी आणि खेदजनक आहे. स्वरा सारख्या अनेक लेकी गावोगावी आनंद राहत आहे. अशा लेकींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकांनी डोळ्यात तेल घालण्याची गरज आहे. हा संदेश देण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा आमचा थोडासा प्रयत्न आहे.

error: Content is protected !!