
कामशेत:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावेत.संबंधितावर कडक कारवाई व्हावी, यासाठी कामशेत पोलीस स्टेशनवर ‘बेधडक मोर्चा’ आज काढण्यात आला.
आम्हाला रक्षक हवा आहे,भक्षक नको.काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध धंदे वाढत असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहे,असा घणाघात करीत आमदार सुनिल शेळके यांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले.
अवैध धंद्याना पाठीशी घालणा-यांवर यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.मावळ तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात अवैध धंदाचा सुळसुळाट झाला आहे. हे वास्तव दाखवण्यासाठी आमदार शेळके यांनी मोर्चाच्या वेळी ग्रामीण भागातील आठ ते नऊ गावांमधून गावठी दारु पोलीस अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी आणली.
हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात याचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे,असे आवाहन शेळके यांनी केली.तालुक्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा आज पोलीस ठाण्या समोर आणलेली दारूची कॅन उद्या अधिवेशनात विधीमंडळात घेऊन जाईन असा इशारा आमदार शेळके यांनी दिला.आमदार शेळके म्हणाले,”
अवैध धंदे तरुण पिढीला बिघडवण्याचे काम करत आहेत.सकाळी उठून व्यायाम करण्याऐवजी दारू कुठे मिळते ही शोधायची वेळ भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तरुणांवर आणली आहे.मागील दीड वर्षांपासून पोलीस प्रशासनाला सांगतोय गावागावात सुरू असलेले धंदे बंद करा.त्याकडे डोळेझाक केली जात आहे. पावसाळी अधिवेशनात देखील यावर आवाज उठवला आहे.
अवघ्या वीस रुपयांची दारू तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त करत आहे.याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा.एका तासात अवैध धंदे बंद करा,अन्यथा ही हातभट्टीची दारु अधिवेशनात नेऊन आवाज उठवण्यात येईल,असा इशारा यावेळी दिला.
यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.रमेशभाऊ साळवे,अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मावळ गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.विठ्ठलराव शिंदे, ॲड.रूपालीताई दाभाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सौ.दिपालीताई गराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मावळ, आजी-माजी पदाधिकारी, महिला-भगिनी, कार्यकर्ते व ग्रामस्थ या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


