
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अवैध धंद्याच्या विरोधात कामशेत पोलीस स्टेशनवर बेधडक मोर्चाचे आयोजन केले. रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून एल्गार करणार आहे.
कामशेत पोलीस स्टेशन परिसरातील अवैध धंदे ताबडतोब बंद करावे या मागणीसाठी हा बेधडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी अधिवेशनात केली. आमदार सुनिल शेळके यांनी कोथुर्णे येथे घडलेल्या पिडीतीला न्याय द्या यासाठी विधीमंडळात आवाज उठवला.
कोथुर्णे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे याकडे लक्ष वेधताना आमदारांनी अवैध धंद्यावर बोट ठेवीत अशा घटना घडवण्यासाठी अवैध धंदेही कारणीभूत ठरत असल्याचे अधोरेखित केले. एकीकडे आमदारांनी विधीमंडळात आवाज उठवला असताना,दुसरीकडे राष्ट्रवादीची टीम रस्त्यावर उतरून एल्गार करणार आहे.
मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वांत मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या कामशेत शहरासह पोलीस स्टेशन हद्दीतील गावात अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आहे. अवैध धंद्यात दारू विक्री,गांजा विक्रीसह जुगार फोफावला आहे.
अवैध धंद्यामुळे तरूण पिढी अक्षरशः बरबाद होत असून व्यसनाधीन तरूणांना कडून समाजविघातक कृत्य घडत आहे.
कोथुर्णे येथे झालेली दुर्देवी घटना याचे ताजे उदाहरण आहे.
पोलीस प्रशासनाने अवैध धंदे बंद करून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा यासाठी आपणा सर्वाना रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची ही वेळ आली असल्याचे राष्ट्रवादीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे अंदोलन होणार आहे.रविवार दि.२१.८.२०२२ला सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजीमहाराज चौकात उपस्थित राहून बेधडक मोर्चात आपण सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



