वडगाव मावळ :
न्यायालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन स्वातंत्रदिन ऊत्साहात साजरा केला.दि १३/०८/२०२२ रोजीचे लोकअदालतमध्ये ३५२ खटले निकाली  4,41,87,230 रुपयांचा  महसूल जमा झाला.
भारताच्या  स्वातंत्रदिनाच्या अमृत महोत्सव वडगाव मावळ न्यायालयात वडगाव मावळ बार असोसिएशन व मावळ तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13/08/2022 रोजी वडगाव शहरात वडगाव मावळ न्यायालयातील न्यायाधिश, वकिल वर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांनी तिरंगा रॅलिचे अयोजन केले होत या रॅलि मध्ये स्वातंत्र सैनिकांच्या वेशभुशेत सहभागी झालेल्या वकिलांमुळे सर्व वातावरण राष्ट्रभक्तिमय झालेले होते. सदरकामी स्वातंत्र सैनिकांच्या वेशभुशेकामी एडव्होकेट विनय दाभाडे यांनी सहकार्य केले. तिरंगा रॅलिनंतर सामाजिक बांधिलकि म्हणुन रक्तदान केले व मा. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाने आयोजित केलेल्या लोकन्यायालात सर्वांनी सहभाग घेवुन एकुण 352 केसेस सामंजस्यानी निकालि काढल्या या लोकन्यायालयात एकुण 4,41,87,230 रुपये रकमेचा महसुल जमा झाला. अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष  अॅड मच्छिंद्र घोजगे  यांनी दिली.
       वडगाव मावळ  येथील अतिरिक्त   जिल्हा व   सत्र न्यायाधीश  मा .व्ही. डी. निंबाळकर साहेब ,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ .स्तर पी. जी. देशमुख साहेब, वडगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ  स्तर व मावळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सी . आर. उमरेडकर साहेब, सह  न्यायाधीश आर. एन. चव्हाण साहेब, एस. जे. कातकर साहेब , एस. आर बर्गे  साहेब  ,ए. एस. अग्रवाल साहेब , जी . एस. पाटील साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
दि.14/08/2021 रोजी स्वच्छता मोहिम व पर्यावरना बाबत जनजागृति करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. दि. 15/08/2022 रोजी सकाळी तिरंग्यास वंदन करुन शालेय विद्यार्थांना वडगाव मावळ बार असोसिएशन तर्फे शालेय वास्तुचे वाटप करण्यात आले व त्यानंतर मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या तिनही दिवशी वडगाव मावळ न्यायालयात ध्वजारोहन करुन ध्वजास वंदन करण्यात आले. वडगाव मावळ बार असोसिएशन तर्फे वेळोवेळी सहकार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
भारतास स्वातंत्र मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र विरांनी प्राणांची आहुती दिलेली आहे मिळालेले स्वातंत्र ते अमुल्य आहे. स्वातंत्र्यामुळे मिळालेल्या हक्कांचा वापर करत असताना त्याबरोबर राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांचे देखील आपन पालन केले पाहिजे.
मा. व्ही. डी. निंबाळकर साहेब, अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वडगाव मावळ म्हणाले,”स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण असताना आपण आपआपसातील वाद लोकन्यायालयात सामंजस्याने मिटवने हि काळाजी गरज आहे. वाद सामंज्यस्याने मिटवण्यासाठि विधी सेवा समीती मार्फत सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.
मा. सि. आर. उमरेडकर साहेब, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समीती  व न्यायाधीश व़डगाव मावळ न्यायालय म्हणाले,”
स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सव साजरा करत असताना रक्तदान, वृक्षारोपन, तिरंगा रॅलि तसेच लोकन्यायालयामध्ये सहभाग घेवुन लोकांमध्ये त्यांच्या हक्कांची तसेच कर्तव्याबाबत जनजागृती करण्याचे काम वडगाव मावळ बार असोसिएशन करत आहे हे काम वकिल संघटनेच्या माध्यमातुन असेच पुढेही केले जाईल अशी ग्वाही ॲड. मच्छिंद्र घोजगे, अध्यक्ष, वडगाव मावळ बार असोसिएशन
ॲड हेमंत वाडेकर,सचिव, वडगाव मावळ बार असोसिएशन यांनी दिले.

error: Content is protected !!