वडगाव मावळ:
सह्याद्री फाउंडेशन वतीने माजी नगरसेवक सुनील ढोरे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेली दहीहंडी काळाचौकी, लालबाग येथील गोविंदा पथकाने ७ थर लावून फोडली. दहीहंडीसाठी ४,४४,४४४ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. यावेळी पाच महिला पथकांनीही सलामी दिली.
आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, बाळासाहेब काशिद, विठ्ठलराव शिंदे, साहेबराव कारके, दीपक हुलावळे, संजय बाविस्कर, किशोर सातकर, दीपाली गराडे, मयुर ढोरे, पंढरीनाथ ढोरे आदींनी या सोहळ्यास भेट दिली. अध्यक्ष विकी ढोरे यांनी स्वागत केले तर राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रवीण ढोरे यांनी सूत्रसंचालन केले.
या सोहळ्यानिमित्त सुवर्णपदक विजेती हर्षदा गरुड हिला माजी नगरसेवक सुनील ढोरे यांच्या वतीने १,११,१११ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली, तसेच राष्ट्रीय खेळाडू चिराग वाघवले व रुचिका ढोरे यांचा सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!