राजगुरूनगर:
खेड तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी किवळे येथील युवा नेते संदेश वाळके यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र खेड तालुका भाजपाचे अध्यक्ष शांताराम भोसले यांनी संदेश वाळके यांना दिले. खेड तालुका भाजपाच्या वतीने भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात वाळके यांच्यासह अन्य जणांवर पक्ष संघटना वाढीची जबाबदारी देण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील,भाजपा युवा मोर्चा खेड तालुका अध्यक्ष काळूराम पिंजन, राजनभाई परदेशी, क्रांतीताई सोमवंशी, शिवाजीराव मांदळे, संजय रौधळ, सुनिल देवकर, संदेश जाधव, राहुल येवले, प्रितम शिंदे, शिवाजी भुजबळ यांच्यासह अन्य  पदाधिकारी यांच्या उपस्थित  नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
संदेश वाळके म्हणाले,” आगामी काळात सर्वसामान्य जनतेला केंद्र बिंदू मानुन, विकासात्मक काम करुन खेड तालुक्यात भाजपा पक्ष आणि भाजपा पक्षाची विचारधारा सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत, पोहचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

error: Content is protected !!