वडगाव मावळ :
मावळ तालुक्याच्या कोथुर्णे गावात घरा पुढच्या अंगणात खेळणा-या अल्पवयीन मुलीस त्यातच गावात  राहणाऱ्या नराधम युवकाने तिचे अपहरण केले. घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला मानवतेला काळिमा फासणारी ही दुर्देवी घटना पंधरा दिवसापूर्वी घडली.
मावळ तालुक्या सारख्या ऐतिहासिक व अध्यात्मिकेचा वसा जपणा-या मावळ तालुक्यात ही घटना घडली.या घटनेतील पिडीत कुटुंबांला न्याय द्या असे आवाहन करीत मावळचे आमदार सुनिल शेळके विधीमंडळात कडाडले.
या पिडीत कुटूंबाला न्याय देण्यासाठी हे प्रकरण फास्टट्रॅक पद्धतीने चालवत आरोपीला शिक्षा करा तसेच या केससाठी विशेष सरकारी वकिल नियुक्त करा अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात केली. ही घटना घडून पंधरा दिवस झाले.विविध राजकीय पक्षांचे नेते कोथुर्णे गावात आले. पिडीत कुटुंबांचे सांत्वन करत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
विविध सामाजिक संघटनांनी व गावातील नागरिकांनी मदत नव्हे कर्तव्य भावनेतून पिडीत कुटुंबांला आर्थिक मदत केली मात्र शासनाकडून तातडीची मदत कधी मिळणार? शासनकर्ते फक्त आश्वासने देत आहे.या घटनेतील नराधाम आरोपी हा कोणी परप्रांतीय नाही किंवा बाहेर गावचा नाही तर त्याच गावातील एका शिक्षिकेचा २४ वर्षीय मुलगा आहे. तो व्यसनाधीन झाला असून त्याने हा घृणास्पद प्रकार केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरु आहे असे सांगितले जात आहे.
आमदार शेळके म्हणाले ,” गावागावांमध्ये अवैध दारुधंदे जोमात सुरु आहेत. कायदेच्या कोणतेही भय नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा होत असताना आजही अनेक गावांमध्ये रस्ते, लाईट, पाणी पोहचलेले नाही मात्र अवैध धंदे पोहचले आहेत. तरुणांना व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी या अवैध धंद्याच्या विरोधात कडक कायदा करा अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
माजी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी देखील सदरचे प्रकरण फास्टट्रॅक पद्धतीने चालवत लवकरात लवकर पिडीत कुटुंबांला न्याय देण्याची मागणी केली. तारीख पे तारीख सुरु राहिल्यास पिडीत कुटुंबाला नैराश्य येथे, रायगड मध्ये असे दोन प्रकार घडले होते याकरिता जलदगती कोर्टात केस चालवा अशी मागणी केली.

error: Content is protected !!