आढले बुद्रुक:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी  जय मल्हार बाळूमामा आशीर्वाद संस्था आढले बुद्रूक मधील  श्री रोहिदास जाधव श्री सुजित घोटकुले कु अविनाश घारे शाळा व्यवस्थापन समिती आढले आणि ग्रामस्थ ह्यांच्या माध्मातून मावळ मधील सर्वात उंच ३६ फूट ध्वज स्तंभाचे अनावरण करण्यात आले .
ध्वजपुजन आणि ध्वजारोहन शाळेतील गुणवंत विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांनी केले .
आकाश जयवंत घोटकुले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. तसेच वाळवा शिक्षण संस्था इस्लामपूर ह्यांच्याकडून जून २०२३ पासून  ११वी आणि १२वी   कला वाणिज्य विज्ञान साठी नवीन शाखा  इमारत आढले बुद्रूक येथे सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली .
थोड्या दिवसात आढले बुद्रूक मध्ये उंच भगवा ध्वज आणि स्तंभाचे अनावरन जय मल्हार बाळूमामा आशीर्वाद संस्थे च्या वतीने करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!