
विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यू
शिरगाव :
शिरगाव येथे शेतात पडललेल्या विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल (दि.१७) रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे यंदाच्या पावसाळ्यात घडलेली ही तीसरी घटना आहे.
राजाराम गोपाळे (वय ६४, रा. शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी पोलीस पाटील समीर शेख यांनी शिरगाव पोलिसांना माहिती दिली होती.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेतकरी भोपाळे हे काल आपल्या पवना नदीपात्राच्या शेजारील शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र यापूर्वी शेतातील विजेच्या खांबावरील विद्युत वाहक तार खाली पडलेली होती. शेतातील उसामुळे व आसपासच्या गवतामुळे गोपाळे यांना सदर तार दिसून आली नाही. शेतात फेरफटका मारताना त्यांच्या पाय त्या विद्युत वाहक तारेवर पडला. त्यामुळे त्यांना विजेचा तीव्र झटका बसला व यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


