टाकवे बुद्रुक:
  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ग्रामीण भागात उत्साहात साजरा करण्यात आला. टाकवे बुद्रुक सह आंदर मावळ मधील प्राथमिक, माध्यमिक विद्यालय या  ठिकाणी अमृत महोत्सव 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक या ठिकाणी जमीन देणगीदार संतोष असवले यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहण करण्यात आले, तलाठी ऑफिस या ठिकाणी पोलीस पाटील अतुल असवले यांच्या हस्ते,ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक येथे  सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पांडुरंग मोढवे यांच्या हस्ते,
न्यू इंग्लिश स्कूल & ज्युनियर कॉलेज  येथील विद्यार्थी दिल्ली पोलीस मध्ये  निवड झालेल्या महेश दत्तात्रय असवले यांच्या हस्ते,
बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल येथे दहावी प्रथम आलेला  विद्यार्थी आदेश खंडू जाधव  यांच्या हस्ते, बुद्ध विहार या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य  प्रतीक्षा जाधव यांच्या हस्ते,
प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी शैलेश साठे यांच्या हस्ते. ग्रुप. ग्राम.सरपंच भोयरे बळीराम भोईरकर यांच्या हस्ते,  खांड निळशी ग्रुप. ग्राम. सरपंच आनंता पावशे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. दरम्यान सर्व गावातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
  हर घर तिरंगा अभियानास उस्फुर्त पणे  सहभाग लाभला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांची भव्य अशी  तिरंगा रॅली काढण्यात आली.भारत माता की जय च्या घोषणा करत मंगलमय वातावरणात यामध्ये सर्व  शाळेतील शिक्षक  गावातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!