टाकवे बुद्रुक:
स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते  ध्वजवंदन  करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते त्यात प्रामुख्याने गावातील समाज मंदिरांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच टाकवे,बेलज,फळणे प्राथमिक  शाळेतील मुख्याध्यापक यांना संविधान पुस्तक वाटप करण्यात आले. त्यांचप्रमाणे तिन्ही शाळांना साठी स्पीकर संच वाटप करण्यात आले.
   केंद्र पातळीवर ज्या विद्यार्थ्यांना  विविध स्पर्धा मध्ये नंबर पटकावला अशा विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती मार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी सरपंच श्री भुषण असवले, उपसरपंच श्री परशुराम मालपोटे, सदस्या सौ.सुवर्णा असवले.सदस्य श्री.विश्वनाथ असवले, सदस्य श्री अविनाश असवले, सदस्या सौ.प्रतिक्षा जाधव, सदस्या, सौ.प्रिया मालपोटे, सदस्य श्री सोमनाथ असवले, सदस्या सौ.संध्या असवले, सदस्या सौ ज्योती आंबेकर, सदस्य  श्री संतू दगडे , सदस्या सौ.जिजाबाई गायकवाड, सदस्या सौ.आशा मदगे , पोलिस पाटील श्री अतुल असवले, राष्ट्रवादी अध्यक्ष श्री.मारूती असवले, माजी सरपंच किसन ननवरे, माजी उपसरपंच रोहिदास असवले, माजी उपसरपंच श्री तानाजी असवले, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड माजी सदस्य श्री ऋषीनाथ शिंदे मा.पो.श्री.ज्ञानेश्वर साबळे, वि.वि.सो.संचालक श्री दत्तात्रय असवले, शालेय शिक्षण स.अध्यक्ष श्री अनिल असवले,माजी सदस्य राजू असवले, श्री राजाराम असवले, पत्रकार श्री संकेत जगताप, श्री चंद्रकांत असवले, माजी उपसरपंच श्री स्वामी जगताप, श्री दिलीप आंबेकर, माजी सदस्य श्री नवनाथ आंबेकर उपस्थित होते.
   सरपंच भूषण असवले म्हणाले,” देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी बलिदान देणा-या हुतात्मांना अभिवादन करण्याचा हा दिवस. आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. आपल्या सर्वाना आपल्या संविधाना बाबत निश्चित आदर आहे.

error: Content is protected !!