माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासमवेत बजरंग दलाच्या शिष्ट मंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्याची भेट
वडगाव मावळ :
मावळ तालक्यातील कोथूर्णे गावात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदु परिषद बजरंग दल मावळ व नागरिकांच्या वतीने पवनानगर  बाजारपेठेत रविवार (दि.०७) रोजी  बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
याच उपोषणाची दखल घेत भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली असता.  मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री यांची भेट घालून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर बेमुदत उपोषण सोडण्यात आले होते. त्याच आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी बजरंग दलाचे शिष्ट मंडळ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे याच्या समवेत बुधवार (दि.१०) रोजी, भेट घेऊन घटनेची सविस्तर माहित देण्यात आली. व निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलतना उपुख्यमंत्री म्हणाले की, मावळच्या लेकी लवकरात लवकर न्याय मिळवुन देण्यात येईल. मी या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असून या प्रकरणासाठी चांगल्यात चांगला वकील देणार असून ही केस फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवणार आहे. व या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल या साठी प्रयत्न करणार आहे. पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीने जी काही मदत करता येईल ती करण्यात येईल तसेच माननीय मुख्यमंत्री यांच्या  माध्यमातून ५ लाखाची मदत करण्यात येईल.
या वेळी बोलताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, स्वराला न्याय मिळेपर्यंत हा लढा शेवट पर्यंत सुरू ठेवणार आहे. व शासनाच्या वतीने या कुटुंबाला जी काही मदत करता येईल ती करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
नराधमाला फाशी ची शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळे पर्यंत बजरंग दल पाठपुरवठा करत राहणार आहे अशी माहिती विभाग संयोजक संदेश भेगडे यांनी दिली.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, विभाग मंत्री संदेश भेगडे, भा ज पा संघटन मंत्री गणेश ठाकर, मुलीचे वडील जनार्दन चांदेकर, गणेश सावंत, सह संयोजक बजरंग दल बाळा खांडभोर, प्रशांत ठाकर, निलेश ठाकर, सुनिल ढोरे, अक्षय येळवंडे, विश्वास दळवी, निलेश खेंगरे, महेश सोनार उपस्थित होते.

error: Content is protected !!