रवि ठाकर एक जिवलग मित्र
मावळमित्र न्यूज विशेष:
आयुष्यभरात अनेक नाती जोडावी लागतात अन जोडलेली नाती जपावी लागतात.नात्यातील दुरावा हा आपणाला नवा नाही.रक्ताच्या नात्यातही कधी वादाची ठिणगी पडते. कधी ती लगेच विझते कधी या ठिणगीची दाहकता सोसावी लागते. एक नात मात्र असं आहे जिथं मनातली सगळं भाव अलगद उमलता येतात. ते नात म्हणजे मैत्रीचे.अशीच मैत्री जपत जिवलग असलेला जोडीदार म्हणजे रवि ठाकर.
    एक सच्चा दिलदार मित्र. ज्याच्या समोर मनातलं सर्वकाही स्पष्टपणे बोलता येते. दु:ख वेदना सर्वकाही शेअर करता येते.
मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी असावी,कधीही न तुटणारी आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये कधीही न विसरणारी ही मैत्रीची व्याख्या आम्हा दोघांना लागू पडते तशी ही व्याख्या आपल्यालाही.
माझा जिवलग मित्र म्हणजे रवि ठाकर. ठाकुरसाईतील तरूण.आयुष्याच्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका साकारणारा हा तरूण. कधी कार्यकर्ता असतो. कधी पत्रकार कधी उद्योजक तर कधी कुटूंबवत्सल लाडका लेक. विठ्ठल नामाच्या गजरातही तो रमतो. तितकाच संवेदनशील मनाचा रवि माणसात मिसळून जातो.पवनाडॅम लगतच्या छोट्या गावातील एक मनमिळाऊ, प्रेमळ, हसरे आणि सर्वाना परिचित असणार व्यक्तीमत्त्व. रवी ठाकर हे पवनानगर आणि परिसर या मध्ये सर्वात आदराने घेतले जाणारे नाव.
मावळ तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी ह्यांना परिचित असणारे एक   बहआयामी व्यक्तिमत्व म्हणजे माझा मित्र रवि.
  मी मावळ तालुक्यात 2011 साली कृषि विभागात हजर झालो. मावळ चा परिसर नवीन होता. कृषि विभागात काम करत असताना असेच एकदा पवनानगर मध्ये रवी ची भेट त्याच्या कृषि सेवा केंद्रात झाली. त्यावेळी तो कृषि सेवा केंद्र चालवत होता. कृषि विभागात असल्यामुळे सतत संपर्क येत राहिला. रवी हा कृषि सेवा केंद्र चालवत असताना पत्रकार म्हणून ही काम करत होता.
   पत्रकारिता हा त्याचा आवडता छंद. मला ते नंतर कळाले. ज्यावेळी आम्ही कृषि विभागात शेतकरी मेळावे, सभा नवनवीन तंत्रज्ञान प्रचार प्रसिद्धीसाठी त्यावेळी मला रवी ची खूप मदत झाली. आणि त्याला ही शेतीची आवड असल्याने त्याने अतिशय आवडीने आमच्या बातम्या, फोटो, लेख वृतपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले. त्याचा कृषि विभाग व शेतकऱ्यांना आता ही फायदा होत आहे.
    मला रवीचे आवडलेले गुण म्हणजे तो नेहमी सर्वाशी आत्मविश्वासाने बोलतो, नम्र वागतो, सतत नवनवीन शिकण्याची धडपड, निस्वार्थी माणूस, कोणती ही अपेक्षा न ठेवता काम करण्याची वृत्ती, चिकाटी, जिद्द. जेव्हा आम्ही दोघे एकत्र गप्पा मारतो तेव्हा आम्हाला वेळही कळत नाही. त्याला शेती आणि राजकारण हे त्याचे आवडीचे विषय आणि माझ्या ही आवडीचे त्यामुळे आमची चांगली घट्ट मैत्री झाली.
     त्याला कसली ही अडचण आली तो निसंकोच सल्ला घेणार. तसे ही आम्ही एकमेकांचे सल्ले घेत असतो. रवी हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असला तरी त्याने आज खूप कष्ट मेहनतीने कुटूंबाची चांगली घडी बसविली आहे. कृषि पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून, शेळीपालन, शेती अशा व्यवसायातून आज चांगली प्रगती केली आहे. कृषि  पर्यटन व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी स्वतः सोबत परिसरातील व्यवसाय करणाऱ्या सगळ्या ना सोबत घेऊन ” पवना कृषि पर्यटन संस्था काढून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे कसा करता येईल, अडचणी कशा सोडविता येतील, ह्या मध्ये  नवनवीन रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील ही सतत ची धडपड करणारा रवी त्या संस्थे सचिव या महत्वाच्या पदावर काम करत आहे.
     त्याच सोबत मावळ तालुका वारकरी संप्रदाय  प्रसिद्धी प्रमुख या पदावर काम करत असतानाच पंचक्रोशीतील गावागावामध्ये भजन,कीर्तन, सुख दुःखाच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतो त्याचा मला सार्थ अभिमान आहे. ह्या व्यक्तिमत्वा विषयी लिहावे तेवढे कमीच आहे. हा माझा  छोटेखाणी लिखाण करण्याचा खटाटोप म्हणजे 10 ऑगस्ट हा रवी चा वाढदिवस.
      वाढदिवसा निमित्त मित्रा तुला माझ्या व परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. तुझे भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
      (शब्दांकन – विकास गोसावी, कृषिसहाय्यक शिळींब)

error: Content is protected !!