*हर घर तिरंगा अभियान गावोगावी राबवणार :-मा राज्यमंत्री बाळा भेगडे
वडगाव मावळ :
भारत देशाला स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण देशभर साजरे होत असताना,देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी आवाहन केलेल्या  ‘हर घर तिरंगा अभियान’ या संदर्भात नियोजन करत असताना संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये हे अभियान यशस्वी करण्यासाठी,मा राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पंचायत समिती गण व जि. प.गट आणि गाव निहाय पदाधिकाऱ्यांना हे नियोजन करण्यात सांगितले व तशा प्रकारची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे.
०९ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान तालुक्यातील असणारे माजी सैनिक हर घर तिरंगा या अभियानाचे तालुका संयोजन गुलाबराव म्हाळसकर यांनी अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली त्यामध्ये दि.०९ ऑगस्ट ते ११ऑगस्ट या दरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील माजी सैनिक,कलाकार,खेळाडू,समाजसेवक यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तिरंगा ध्वज भेट देऊन देशाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षाचे महत्व विशाद करायचे आहे.
दिनांक १२ ऑगस्ट रोजी तिरंगी रॅलीचे आयोजन करून संपूर्ण तालुका तिरंगामय करावा असे आवाहन करून तिरंगा ध्वज उभा करताना तो प्लास्टिक, कागदी,नसावा तसेच ध्वजाचा केसरी भाग वरील बाजूस असावा अशी माहिती दिली. दि.१२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तिरंगा रॅलीच्या नियोजनाबद्दल मावळ तालुका भाजपा युवा मोर्च्या व विद्यार्थी आघाडी च्या वतीने होणाऱ्या तिरंगा रॅली नियोजनाची तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीपजी काकडे यांनी माहिती दिली.
याप्रसंगी,मा उपासभापती शांताराम कदम,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,सरचिटणीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, सुभाष धामणकर,बाळासाहेब घोटकुले,यादव सोरटे, रवी आंद्रे,प्रवीण शिंदे,विकास लिंभोरे,विठ्ठल तुर्डे,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, गटनेते दिनेश ढोरे,माऊली आडकर,रविभाऊ शेटे,मा सरपंच नितीन कुडे,नामदेव वारींगे, अक्षय भेगडे,शिवांकुर खैर,प्रदीप हुलावळे,सचिन येवले,सागर येवले,गणेश ठाकर,सचिन पांगारे, हरिभाऊ दळवी,अक्षय म्हस्के,अर्जुन पाठारे,राजाराम असवले, सचिन कदम, दत्ता पडवळ,व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!