भोयरे:
   आम्हा लेकी बाळींची सुरक्षिततेसाठी शासन उदासीन आहे. सरकार कोणाचेही असो,आमच्या सुरक्षिततेबाबत ही उदासिनता का?असा सवाल करीत स्वराच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी भोयरेतील लेकीसुना.आणि मुलीबाळींनी केली.
भोयरे येथील मंदिरा पासून ते गावांमधून महिलांच्या व नागरिकांच्या वतीने कँडल मोर्चा काढण्यात आला होता.
आरोपीस फाशी द्यावी, अशी मागणी करत या घटनेचा निषेध म्हणून  मोर्चा काढला होत.यावेळी महिलांनी सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उभे केले.
कोथुर्णे (ता. मावळ) येथील स्वरा चांदेकर या ७ वर्षीय मुलीचे अपहरण करून, तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीस व त्याच्या आईस न्यायालयाने 10 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी (ता. 2) दुपारी कोथुर्णे येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. बुधवारी (ता. 3) त्या मुलीचा मृतदेह त्याच गावातील शाळेच्या मागच्या बाजूला आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी तेजस महिपती दळवी (वय 24) व त्याची आई सुजाता महिपती दळवी यांना अटक करून, गुरुवारी न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने दोघांना दहा ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप करत आहेत. दरम्यान, भोयरे येथील मंदिरा पासून ते गावांमधून महिलांच्या व नागरिकांच्या वतीने कँडल मोर्चा काढण्यात आला होता. आरोपीस फाशी द्यावी, अशी मागणी करत या घटनेचा निषेध म्हणून  मोर्चा काढला होता.

error: Content is protected !!