जागृती संस्थेकडून प्रशिक्षणार्थी परिचारिकांना प्रमाणपत्रांचे वाटप
कामशेत :
येथे जागृती संस्थे तर्फे परिचारिका प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. हे प्रशिक्षण कामशेत येथील महावीर हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले सहा महिने हे प्रशिक्षण चालू होते या मध्ये तीन महिने थियरी व तीन महिने प्रॅक्टिकल असून त्यामध्ये ५० विद्यार्थी सहभागी झाले होते या प्रशिक्षणास विद्या मालपोटे, डॉ. विकेश मुथा, डॉ सुदर्शन सांवत, डॉक्टर नेहा ओव्हाळ, अनिता खंडारे, बाळासाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण पूर्ण केल्या प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे २५ विध्यार्थीनी त्यात प्रमिला आडकर, वर्षा खादवे, गीतांजली वाघावले, प्रतीक्षा भोकरे, प्रतीक्षा दौंडे या विध्यार्थीनीना प्रशिक्षण घेतल्या बद्दल सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जयश्री काळे, मुकुंद शेवरे, रेखा शेवरे, कर्नल पवन नायर डॉ. माधुरी जोशी, विश्वास काळे, अनिल बिडकर, डॉ. विकेश मुथा, गणेश भोकरे, पंडित नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक धावडे सर, मुकुंद ढोरे, शरद वाजे व महावीर हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!