संस्कार  प्रतिष्ठानचे रक्षाबंधन भारतीय सैनिकांसोबत
पिंपरी:
भारत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पंजाब मधील भारत पाकिस्थानच्या आटारी(वाघाबॉर्डर) बॉर्डरवरील सैनिकांना राख्या बांधुन रक्षाबंधन सण साजरा करणार आहेत. महाराष्ट्रातील नाशिक औरंगाबाद सोलापूर पुणे सातारा या जिल्ह्यातील ७५ महिला ७५ राख्या घेऊन ७५ झेंडे घेऊन शनिवार दि,६/८/२०२२ रोजी सायंकाळी ५ वा झेलम एक्स्प्रेसने रवाना होत आहेत.
या रक्षाबंधनचे वैशिष्ट्य असे आहे मराठी अभिनेत्री रुपाली पाथरे सहभागी आहेत.हे दुसरे वर्ष आहे यासाठी महिला सभासदांनी एकसारख्या साड्या त्यावर लागणारे साहित्य खरेदी केले आहे.
याची तयारी ४ महिन्यापासून चालु आहे.याचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड मनोहर कड प्रतिभा पुजारी सायली सुर्वे आनंद पुजारी  भारती कदम दत्तात्रय देवकर आनंद पाथरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!