रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा पदग्रहण समारंभ संपन्न
तळेगाव दाभाडे:
ऐतिहासिक भूमी तळेगाव दाभाडे हीच प्रेरणा मानून मी सरस्वती मातेची पूजा माझ्या लेखणीच्या माध्यमातून केली. माझ्या लेखनास साहित्याची उत्तम जाण असणाऱ्या तळेगावकरांनी दाद दिली. साहित्य निर्मितीच्या माध्यमातून स्वनिर्मितीचा आनंद मिळवूत असतानाच साहित्याद्वारे समाजप्रबोधनांमध्ये मी माझा खारीचा वाटा उचलला आहे. आणि त्या समाजकार्याची ही पावती आहे. अशी भावना प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक श्री जयंत जोर्वेकर यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या चौदाव्या पदग्रहण समारंभ प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्यावतीने रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी समारंभाचे अध्यक्षपदी डायरेक्टर टी आर एफ नितीन ढमाले तर प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश गारोळे उपस्थित होते. दीप प्रज्वलन व कै. अॅड. शलाका संतोष खांडगे यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
नूतन अध्यक्ष विल्सन सालेर व नूतन सचिव मिलिंद शेलार यांनी पदभार स्वीकारला. यावेळी संचालक मंडळाची घोषणा व नवीन १४ सभासदांनाही पिनअप करण्यात आले. याप्रसंगी कै. ॲड. शलाका संतोष खांडगे यांच्या स्मरणार्थ नगरपरिषद शिक्षण मंडळ तळेगाव दाभाडेच्या सर्व शाळातील आर्थिक दुर्बल घटकातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत रोटरी स्कूल किट चे वाटप करण्यात आले. रोटरी बुलेटीनचे प्रकाशन, टेबल कॅलेंडर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व विल्सन सालेर व मिलिंद शेलार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले. संतोष खांडगे यांची जिल्हा डायरेक्टरपदी, शंकर हदीमनी यांची रीजन दोनचे ए.जी.ए. पदी व हिरामण बोत्रे यांची पर्यावरण डायरेक्टर म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तळेगाव येथील लिब फाटा येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या फलकाचे नामकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन विलास टकले, योगेश शिंदे, पांडुरंग पोटे, सचिन कोळवणकर, मिलिंद शेलार यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर व अनिल धर्माधिकारी यांनी केले. तर आभार राहुल खळदे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!