शेतकरी पुत्र ते डिजिटल मिडियाचा संपादक: शेतकरी पुत्राची यशोगाथा
मावळमित्र न्यूज विशेष:
आई वडील शेतकरी..त्यामुळे गाई वासरे अन बैलजोडीवर.. जीवापाड प्रेम करीत… त्याचं बालपण सरलं.. वडिलांनी बैलजोडीला दिलेली साद.. आणि आईच्या डोळ्यात धान्याची रास भरताना दिसलेला वात्सल्याचे भाव टिपायला तो शिकला.  ही साद अन वात्सल्य शब्दात मांडता मांडता पत्रकारितेच्या क्षितिजावर त्याने आपलं नाव कोरलं.विशाल विकारी असे या
शेतकरीपुत्राचे नाव.शेतकरीपुत्र ते डिजिटल मिडियाचा संपादक असा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे.
ज्या हाताने शेतात नांगर हाकला. शेतीची मशागत केली त्यातच हाताने लेखणी चालवून कित्येक मनाची मशागत केली.
अनेक समस्यांना वाचा फोडून शासन दरबारी न्याय मिळवून दिला. विशाल विकारी लोणावळा व मावळ तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातील सुपरिचित असे नाव.वाकसई चाळ या लहानश्या वस्तीमध्ये ५ ऑगस्ट १९८३ साली विशाल यांचा जन्म झाला.
वडील शेतकरी असल्याने समज आली त्या वयापासून वडिलांच्या सोबत शेती मध्ये काबाडकष्ट करीत विशालने शिक्षण घेतले.
लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र.७ येथून इयत्ता पहिली ते सातवी पर्यत शिक्षण पुर्ण केले. या शाळेच्या भिंतीवरील सुविचारांचा म्हणीचा त्यांनी बातमीत खुबीने वापर केला आणि प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन भरले. आठवी ते बारावी पर्यतचे शिक्षण व्हीपीएस हायस्कूल मध्ये झाले. त्यानंतरचे काॅमर्सचे शिक्षण लोणावळा महाविद्यालयातून घेण्यात आले. शिक्षणाचा हा प्रवास सुरू असताना त्यांनी इयत्ता बारावी पासून सहा सिटर रिक्षा चालवत प्रवासी वाहतुकीची सेवा केली आणि स्वावलंबनाचा धडा अंगीकारला.
पदवी पर्यतचे शिक्षण घेत घेतले, सोबतच पत्रकारितेला सुरुवात केली. २००३  साली इंद्रायणी वार्ता या साप्ताहिकामधून पत्रकारितेला सुरुवात केल्यानंतर २००५ सालापासून लोकसत्ता या राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रात कामाला सुरुवात झाली. पुढे काही काळ सकाळ, पुण्यनगरी, प्रभात अशा लोकप्रिय दैनिकात लेखन केले.
mpc news या डिजिटल मिडियामध्ये  काम केले. २०११ सालापासून लोकमत या दैनिकात रुजु झाले. कोरोना काळात २०२० साली मावळ माझा न्युज या डिजिटल मिडियाची स्थापना केली व आज मावळ तालुक्यातील लोकप्रिय न्युज पोर्टल असा गौरव प्राप्त केला.
  तालुक्यात सर्वांधिक वाचकसंख्या असलेले हे न्युज पोर्टल तालुक्यातील प्रत्येकाच्या घरात पोहचले आहे. शेता मध्ये राबणारे हात आता डिजिटल मिडियामध्ये काम करत आहे. बदल हा निसर्ग नियम असल्याने बदलत्या काळातील डिजिटल मिडियाचे वाढलेले महत्व व क्षणाक्षणात नागरिकांना आपल्या आजुबाजुला घडणार्‍या घडामोडीची माहिती देणार्‍यासाठी मावळ माझा या डिजिटल मिडियाची निर्मिती केली असून त्या माध्यमातून तालुक्यातील जनतेची अविरत सेवा सुरु आहे.
विशाल यांचे नाव,पत्रकारितेतील आदर्श नाव आहे. लेकाने मिळवलेल्या या कारकिर्दीचा आई वडीलांना अभिमान आहे. तर यशस्वी पती,कर्तबगार वडील अशा भूमिकेतून विशाल घराचे घरपण जपत ‘समस्त विकारी कुटूबियांसाठी आयडाॅल आहे.
पत्रकारिता क्षेत्राचा प्रदिर्घ अनुभव असलेल्या विशाल विकारी यांनी लोणावळा शहर पत्रकार संघाचे दोन वेळा अध्यक्षपद भुषविले आहे. या दरम्यान,विशाल यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले.तालुक्यातील पत्रकार बांधवाना पत्रकारितेने प्रशिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला. सर्वच पत्रकारांनी पत्रकारितेचे प्रशिक्षण घ्यावे असा उपक्रम घेतला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
पुणे जिल्हा मराठी संघावर देखील त्यांनी काम केले आहे. मावळ तालुक्यातील अनेक नव पत्रकारांना त्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा या सर्व क्षेत्राची जाण असल्याने प्रत्येक विषयावर सडेतोड लिखाण ते करतात. चांगल्याचे कौतुक व वाईटावर प्रहार ह्या त्यांचा लिखानाचा वारंवार तालुक्यातील जनता अनुभव घेत आहे. त्यांचे लिखान व सेवा अशीच अविरतपणे सुरु रहावी ही वाढदिवसाच्या निमित्त आई एकविरा देवीच्या चरणी प्रार्थना.
error: Content is protected !!