पवनानगर :
कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलगी  हत्या निषेधार्थ पवनमावळात कडकडीत बंद, सर्वपक्षीय नेत्यांकडून व सामाजिक संस्थेकडून घटनेचा निषेध
कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलगी अपहरण व हत्या प्रकरणातील नराधाम आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी व आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता प्रयत्न करावेत अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. कोथुर्णे गावातील सात वर्षी मुलीचे दोन दिवसापुर्वी अपहरण झाले होते. काल तीचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे मिळून आला होता. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी आरोपीला २४ तासात अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र या घटनेची संतप्त प्रतिक्रिया मावळात उमटली असून आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आज पवनानगर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे मावळ तालुका हादरला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व  संतांच्या भुमीत असे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची मागणी करण्यात आली. आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांनी संताप व्यक्त केला.
या निषेध आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने महिला युवक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत काळे झेंडे व काळी फित लाऊन कॅन्डल मोर्चा काढला. या नराधमाला फाशी झालीच पाहिजे व स्वराला न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी केली. माणुसकीला काळींबा फासणारी ही घटना काल मावळ तालुक्यात घडली. या घटनेने मावळ तालुक्यासह पुणे जिल्हा हादरला असून आरोपीला फाशीच व्हावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांसह आंदोलनकर्त्यानी मावळवासीयांनी केली.
यावेळी आमदार उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, गणेश खांडगे, ज्ञानेश्वर दळवी, किशोर भेगडे, नितीन घोटकुले, सायली बोत्रे, सचिन घोटकुले, नामदेव ठुले, ज्ञानेश्वर दळवी, महादेव कालेकर, नितीन घोटकुले विश्वनाथ जाधव,  अमित कुंभार, ज्ञानेश्वर ठाकर आदींनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केली.
यावेळी पवनानगर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला.

error: Content is protected !!