कुरवंडी:
श्रीक्षेत्र वेळेश्वर (कुरवंडी, ता. आंबेगाव) येथे पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने नक्षत्रबाग या संकल्पनेवर आधारीत वृक्षारोपण करण्यात आले.
         श्रीक्षेत्र वेळेश्वर येथे पुरातन महादेवाचे मंदीर असुन श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते. याठिकाणी मंदीर व परिसरात सुशोभीकरणाची कामे सुरू असुन वृक्षारोपण करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन संस्थेचे अक्षय शेटे, बाबासाहेब दिघे, सदाशिव आमराळे व महेंद्र कडलग यांनी नक्षत्रबाग करण्याचे निश्चित केले. त्यानुसार सत्तावीस नक्षत्राचे व चांगली वाढ झालेले आराध्य वृक्ष नर्सरीतून आणण्यात आले.
प्रत्येक झाडाची एका नक्षत्राशी ओळख जोडलेली आहे.वड, पिंपळ अशा २७ प्रकारच्या भारतीय झाडांच्या पाने, फुले व फळे या तिन्ही घटकांचा औषधी उपयोग होतो. वेळेश्वर येथे या सर्व झाडांची जोपासना करून नक्षत्रवन ही संकल्पना साकार केली जात आहे. ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, नामदेव महाराज वाळके, अॅड. किरण झिंजुरके व शामकांत निघोट यांच्या हस्ते वृक्षांचे पुजन करून वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी दिलीप पवळे, संतोष टाकळकर, सचिन उढाणे, सुभाष जैद, रविंद्र तोत्रे, अंकुश कातळे, भैरू निघोट, माऊली एरंडे व विपुल मोरे उपस्थित होते.
पर्यावरण संस्थेच्या वतीने झाडांना वेळेवर पाणी पुरवठा करण्यासाठी ठिबक संचही देण्यात आला असुन ही नक्षत्रबाग पर्यावरणाचे दृष्टीने व वृक्षलागवडीसाठी आदर्श उपक्रम ठरेल असा विश्वास पंचक्रोशीतील भाविकांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!