ढोल पथकांचा जोरदार सराव
डबेवाल्यांच्या कमरेला ढोल
मुंबई:
डबेवाले जरी मुंबईत काम करत असले तरी आपली परंपरा,खेळ यांची संस्कृती त्यांनी मुंबईत जपली आहे. मुंबईत पुणेरी ढोल पथके ही संकल्पनां ख-या अर्थाने सर्व प्रथम डबेवाल्यांनीच आणली. कारण गावाकडे करमणूकीचे साधन म्हणजे ढोल पथक असायचे अनेक जण या ढोल पथकात कार्यरत असायचे.
पुढे जसं जसं गणपती उत्सवाचे स्वरूप पालटत गेले ते भव्य दिव्य होत गेले तसं तसं या ढोल पथकांना मागणी वाढत गेली. आज मुंबईत सार्वजनिक गणपती पुढे एक तास ढोल वाजवायचे म्हणले की दहा ते पंधरा हजार रुपये बिदागी मिळते. या मुळे ही ढोल पथके आर्थीक दृष्ट्या सक्षम होत गेली.
राजगड ते शिवनेरीदरम्यान पसरलेल्या या मावळात अनेक गावात ही ढोल पथके आपल्याला दिसुन येतील या पथकांनी मावळची परंपरा व संस्कृती जपण्याचे काम केले आहे. या परंपरेस पुणेरी ढोल पथके असेही म्हणतात. अशी शेकडोंनी पथके मावळ प्रांतात आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनी ही पारंपरिक कला जपली आहे . या ढोल पथकांना मुंबई आणि पुण्यातून मोठी मागणी असते. मावळची ही वादक मंडळी पुण्या मुंबईत दहा दिवस मुक्काम ठोकुन असतात. मुंबईत एखादी खोली किंवा हॉल दोन आठवडय़ांसाठी भाडय़ाने घेतला जातो. तिथे सगळी वाद्यं ठेवली जातात. खाद्य सामान गावाकडून आणले जाते. गहू, तांदूळ, डाळ, तिखट मसाला सोबत ठेवला जातो. भाडय़ाने घेतलेल्या खोलीत सामूहिकरीत्या स्वयंपाक बनवला जातो. आजघडीला डबेवाले आणि त्यांच्या गावातील अनेक ढोल पथके मुंबईत कार्यरत आहेत. ही ढोल पथके खर्या अर्थाने गावच्या विकास कामात मोठा सहभाग नोंदवत असत, गावाला विकास कामाला निधी लागत असेल तर हा निधी ढोल पथके सढळ हस्ते गावाला देत असत.
पण करोना आला आणी गेले दोन वर्ष या पथकांची कमाई बंद झाली. ही पथके आर्थीक दृष्ट्या संकटात सापडली. परंतु या वर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे त्या मुळे या ढोल पथकांना   गणेश आगमन आणी विसर्जनाच्या सुपार्या मिळणार आहेत. ढोल पथकाचे ढोल आणी ताशे गेले दोन वर्ष अडगळीत पडून होते ते यावर्षी त्यांनी बाहेर काढले आहेत गेली दोन वर्ष ढोल ताशे अडगळीत पडून असल्या मुळे त्यांची पाने खराब झाली होती पाने बदलली जुनी पाने काढून तेथे नविन पाने लावली व ढोल पथकांनी जोरदार सराव सुरू केला आहे.
सुभाष तळेकर.(अध्यक्ष  मुंबई डबेवाला असोशिएशन) म्हणाले,”
या ढोल पथकांनी खर्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृतीक परंपरा जपण्याचे मोठे काम केले आहे करोनाच्या पार्श्वभुमीवर गेली दोन वर्ष ही ढोल पथके आर्थीक दृष्ट्या अडचणीत आली होती परंतु या वर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्या मुळे ढोल पथक पुन्हा एकदा सुपरी वाजवण्यास सज्ज झाली आहेत.

error: Content is protected !!