बेपत्ता मुलीचा सापडला मृतदेह  कोथुर्णे गावातील घटना
मावळ तालुका हळहळला
कोथुर्णे:
कोथुर्णे गावातील बेपत्ता असलेल्या सात वर्षीय  चिमुरडीचा  मृतदेह सापडला. (बुधवारी) तिच्या गावाजवळच एका झुडपात तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.स्वरांजली जनार्दन चांदेकर (वय सात) असे या मुलीचे नाव आहे.
स्वरांजली ही काल (मंगळवारी) तीनच्या सुमारास बेपत्ता झाली होती. त्यानंतर घरच्यांची धावाधाव सुरु झाली. शोध सुर असताना तिचा मृतदेह गावाजवळच एका झुडपात अढळून आला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
स्वरांजली ही इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होती. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून कामशेत पोलीस हा अपघात आहे की घातपात याचा तपास करीत आहेत.

error: Content is protected !!