पवनानगर : पवना नदीपात्रात ब्राम्हणोली येथे पोहण्यासाठी गेलेल्या काले येथील युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार (ता. ३) रोजी सकाळच्या सुमारास घडली.
कृष्णा भाऊ कालेकर (वय १७) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काले येथील तरुण कृष्णा कालेकर ब्रोम्हणोली येथील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला परंतु बराचवेळ तो घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली त्यानंतर त्याचे कपडे नदीपात्राबाहेर आढळून आली त्यानंतर त्याचा मृतदेह शोधण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. शिवदुर्गच्या सदस्यांनी दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह दुपारी साडेबाराच्या सुमारास बाहेर काढला.
त्याच्या पश्चात वडील, आई व आज्जी असा परिवार असून एकुलता एक असलेल्या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने कालेकर परिवारावर व नातेवाईक यांच्चावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सदर विद्यार्थी पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता त्यामुळे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. युवकाचा शोध घेण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यु टीमचे महेश मसने, राजेंद्र कडु, कुणाल कडु, हर्षल चौधरी, रतन सिंग, आकाश घरदाळे, वैष्णवी भांगरे, सागर कुंभार, दक्ष काटकर, यश वाडेकर, सचिन वाडेकर, अनिल आंद्रे, ओंकार कालेकर, सुनिल गायकवाड आदींनी अथक परिश्रम घेतले. तर या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विजय गाले, पोलिस कॉन्स्टेबल संतोष शेळके हे करत आहे.

error: Content is protected !!