शिवलीच्या सरपंचपदी अलका आडकर बिनविरोध
पवनानगर :
शिवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका संतोष आडकर यांची बिनविरोध झाली. मावळत्या सरपंच आशा सुतार यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामसेवक शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.
यावेळी निर्धारित वेळेत आडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बी. डी. राक्षे यांनी अलका आडकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,सर्व भाजपा  पदाधिकारी, व कार्यकर्ते यांच्या उपस्थित सरपंच अलका संतोष आडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला
यावेळी माजी सरपंच आशा सुतार, उपसरपंच चंद्रकांत येवले, सदस्य संगीता वाघमारे, उषा आडकर, रतन लोखरे, अश्विनी लोहर हे सदस्य तसेच भाजपा चांदखेड गणाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आडकर, मा. सरपंच रमेश आडकर, बाळासाहेब जाधव, रघुनाथ आडकर, नाथा आडकर, तुकाराम आडकर, संतोष आडकर, मा. पोलीस पाटील किसन आडकर, बाळासाहेब आडकर, पोलीस पाटील संदीप आडकर, रवींद्र आडकर, नितीन आडकर व ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!