टाकवे बुद्रुक:
येथे संकेतदादा असवले प्रतिष्ठान यांच्या वतीने तृतीय पुण्य स्मरण दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य वाटप  करण्यात आले.
प्रथम दोन वर्ष  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उस्फुर्त प्रतिसाद शिबिराला लाभला होता  .
दरम्यान या तिसऱ्या वर्षी  शाळेतील गुवणत विदयार्थीचा  मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील गरजु  विदयार्थी यांना शालेय  साहित्य वाटप करण्यात आले.  
या कार्यक्रमाला नंदकुमार असवले, टाकवे नाणे गट अध्यक्ष रोहिदास असवले, माजी सरपंच तुकाराम असवले सयाद्री प्रतिष्ठान अध्यक्ष सदानंद पिलाने,सदस्य सोमनाथ असवले, उद्योजक गोरख असवले, अध्यक्ष बंडोबा मालपोटे, ज्येष्ठ नेते काळूराम मालपोटे, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड, प्राध्यापक बाळासाहेब उभे, शिक्षक नारायण असवले उद्योजक देवा गायकवाड, संचालक दत्तात्रेय असवले, माजी सरपंच तानाजी असवले,दत्तात्रय घोजगे,मारुती आंबेकर, साहेबराव आंबेकर, अमित असवले, समीर असवले, विक्रम असवले, गणेश काकरे, संचालक तानाजी गुनाट आदी नागरिक विद्यार्थी, शिक्षक, संकेत दादा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
आयोजन टाकवे बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सोमनाथ असवले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण असवले सर यांनी केले.

error: Content is protected !!