विजयाचा निर्धारासाठी मावळातील मनसे सैनिक मुंबईत एकवटला
मुंबई:
पुणे जिल्हा परिषद व मावळ पंचायत समितीच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले आणि मावळातील पण नोकरी व्यवसायासाठी मुंबई शहरात राहणा-या मनसे सैनिकांनी मुंबईत बैठक घेऊन विजयाचा निर्धार केला.
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका आरक्षण जाहीर झाले. त्या पार्श्वभूमीवर आंदर मावळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आढावा बैठक पार पडली या बैठकी मध्ये आंदर मावळ मधुन जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समिती पूर्ण ताकतीने लढवण्याचा निर्धार सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक यांनी केला.
  आंदर मावळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मिटिंग मुंबई पवई येथे पार पडली.आगामी  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकित आपले उमेदवार कसे निवडून येतील, निवडणुकीला कसे सामोरे जायचे या विषयावर विचार विनिमय करण्यात आला.
   या निवडणुकांत एक दिलाने काम करून पुर्ण ताकदीने लढवायच्या असा निर्धार बैठकीत करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र सैनिक संतोष मोधळे, तुकाराम घाग, बबन आलंम ,दत्ता तुर्डे ,संतोष कल्हटकर, विकास आलम, प्रभाकर शिंदे, दत्ता घुडे, बबन तुर्डे ,विलास देशमुख ,भरत घाग, विठ्ठल शिवेंकर, संतोष तुर्डे ,नवनाथ तुर्डे, रवी शिगवण, रामदास गिर्हे  यांच्यासह अन्य मनसे सैनिक उपस्थित होते.
   संतोष मोधळे म्हणाले,” आम्ही मंडळी पोटापाण्यासाठी घरदार सोडून मुंबईत राहत असलो तरी,आमची नाळ ही आंदर मावळाच्या मातीशी जोडली आहे.या मातीची सेवा करण्यासाठी आमचा जीव तगमग करतो.

error: Content is protected !!