गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
कर्जत:
जुम्मापट्टी ता.कर्जत जि .रायगड येथील इ १ ली ते इ ८ पर्यंतच्या १०९ विद्यार्थ्यांना पाटी,पेन्सिल,वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या,पुस्तके,पेन,खोडरबर,शिस पेन्सिल,ड्राईंग पेपर,डिझाईनचे पेपर,रंगपेटी,ड्राईंग शिट्स,वह्यांचे कव्हर,पट्टी इ.साहित्य पिंपरी चिंचवड मनपा शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका  सौ मिनाक्षी  मेरुकर मॕडम व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ रंजना गोराणे मॕडम संस्थेच्या सभासद सौ सायली सुर्वे,सौ पल्लवी नायक,मिलन गायकवाड,केतन पालांडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते.हि शाळा आदिवासी भागातील असुन विद्यार्थ्यांचे आई वडील मोलमजूरी करुन आपल्या मुलांना शिकवत असतात.या शाळांचे संस्थेच्या वतीने दरवर्षी एप्रिल महिन्यात सर्वे केला जातो.यावर्षी मे महिन्यातच वह्यांपुस्तके जमा करण्यात आले.यामध्ये ब-याच दानशुर व्यक्तींनी मदत केली,अगदी बाहेरच्या जिल्ह्यातील मदत पण आली.
याचे संयोजन डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव भरत शिंदे,अनुषा पै,विद्या भागवत,प्रभाकर मेरुकर,खजिनदार मनोहर कड,रुपाली नामदे,गुणवंत कामगार सुभाष चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिमटे,डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोहन चितलांगे सर सौ सुनिता गायकवाड यांनी केले होते.जि.प.शाळा जुम्मापट्टीच्या मुख्याध्यापिका सौ गिता पाटील,सुनिता खैरे,माधुरी केदारी,छाया चव्हाण आणि पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!