इंदोरी:
शिक्षक हा समाजशील प्राणी असून त्या भावनेनेच त्याने सदैव कार्यरत राहून विद्यार्थी घडविण्याचे काम केले पाहिजे असे मत पुणे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक सुरेशभाई शहा यांनी व्यक्त केले
प्रगती विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज इंदोरीचे प्राचार्य चंद्रकांत धनवे यांचा सेवा पूर्ती समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी सुरेशभाई शहा बोलत होते.
शिक्षकाची भूमिका  शिक्षणाबरोबरच देशाची नवी पिढी घडविण्याचे काम करत असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, संस्थेचे संचालक व कान्हे शाळेचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे, कार्ला शाळेचे अध्यक्ष सोनबा गोपाळे, प्रगती शाळेचे अध्यक्ष दामोदर शिंदे, माजी मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे, सिमा गावडे, बबन तांबे, माजी पर्यवेक्षक महादेव थोरात, बलभीम भालेराव परांजपे शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, अंजली दौंडे,भाऊसाहेब आगळमे,प्रगती शाळेचे पर्यवेक्षक सुदाम वाळुंज,  विठ्ठल कुंभार, हेंमत दिगंबर यांच्यासह आजी माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी शाळेच्या वतीने चंद्रकांत धनवे यांचा मानपत्र, सन्मान चिन्ह,शाल, तुकाराम महाराज गाथा देऊन तसेच संपूर्ण पोषाख  सपत्नीक सत्कार करण्यात आला
यावेळी विठ्ठल शिंदे,सोनबा गोपाळे, यादवेंद्र खळदे, भाऊसाहेब आगळमे, पांडुरंग पोटे यांनी आपली मनोगते व्यक्त केले
यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेने मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्ञानदान करण्याची संधी दिली. मी माझ्या क्षमतेप्रमाणे व ज्ञात असलेल्या ज्ञानाप्रमाणे समाज्याशी बांधिलकी जपत निःस्पृह वृत्तीने तीस वर्षे ज्ञानदानाचे काम केले यापुढील काळातही शिक्षणक्षेत्रात कार्यरत राहील
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुदाम वाळुंज यांनी केले सुत्रसंचालन वैजयंती कुल व मोहिनी ढोरे यांनी केले तर आभार लक्ष्मण मखर यांनी मानले.

error: Content is protected !!