कशाळ:
अनांथ निराधार व गरजु मुलांसाठी ‘एक हात मदतीचा’या  उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कशाळ येथील विद्यार्थांना मदतीचा हात देण्यात आला. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या संकल्पनेतुन एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्येमातुन दफ्तर व वह्या वाटप करण्यात आले.
छान प्रकारे या मुलांच्या चेहरावरील आनंद आसाच पुढे दिसण्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत नकीच या पुढे ही मदत करु असे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष श्री संदीप बबन कल्हाटकर यांनी केले.
यावेळी मा,सरपंच शरद जाधव अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, श्री बाळासाहेब थरकुडे सर कार्याध्यक्ष क्रिडा आघाडी भाजप,श्री मंगेश जाधव सचिव मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस,श्री नवनाथ कल्हाटकर मा अध्यक्ष शाळा व्यवस्थान समिती,श्री प्रशांत जाधव अध्यक्ष श्री मळुबाई प्रतिष्ठान ,संदीप जाधव, मा संचालक, मुख्याध्यापक मस्तुद सर,मोरे सर,इंगळे मॅडम,थोपटे मॅडम, मोदी मॅडम उपस्थित होते.

error: Content is protected !!