वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी राजेंद्र कुडे
वडगाव मावळ :
वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र विठ्ठलराव कुडे विजयी झाले. त्यांनी भाजपचे नगरसेवक किरण म्हाळसकर यांचा चार मतांनी पराभव केला. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
मावळत्या उपनगराध्यक्षा पुनम जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपनराध्यक्ष पद रिक्त झाले होते. यामुळे उपनगाध्यक्ष पदासाठी बुधवारी वडगाव नगरपरिषदेत निवडणूक घेण्यात आली होती.
मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र कुडे यांना नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यासह नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, पूजा वहिले, प्रमिला बाफना, माया चव्हाण, पुनम जाधव, सायली म्हाळसकर अशी दहा  मते मिळाली.
तर भाजपचे किरण म्हाळसकर यांना विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, दीपाली मोरे अशी सहा मते मिळाली. यावेळी भाजपचे नगरसेवक सुनिता भिलारे व दशरथ केंगले हे गैरहजर होते.
निवडीनंतर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, पंढरीनाथ ढोरे, विलास दंडेल, चदुकाका ढोरे, राजेश बाफना, विशाल वहिले, प्रवीण ढोरे, सुरेश जांभुळकर, मंगेश खैरे, सुनील शिंदे, आफताब सय्यद, शरद ढोरे, गणेश प. ढोरे,, सोमनाथ धोंगडे, शैलेश वहिले, निलेश म्हाळसकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रविण ढोरे, भाऊसाहेब ढोरे, आदी उपस्थितीत होते.

error: Content is protected !!