टाकवे बुद्रुक:
माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते  अजित  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे येथे  कोविड मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालक मृत पावले अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदर मावळ यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमांनिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मंत्री  नारायण ठाकर ,माजी कार्याद्यक्ष  शिवाजी असवले,  किसान सेल अध्यक्ष  दिगंबर आगिवले , अनिल मालपोटे ,आंदर मावळ  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश घोजगे, लोकनियुक्त सरपंच  बळीराम भोईरकर , आं मा रा कॉं युवक अध्यक्ष  भारत आडिवळे ,मुख्याध्यपक  विरणक, मोहन भोईरकर  ,शिक्षण समिती अध्यक्ष  रामदास भोईरकर , बळीराम आडिवळे , शुभम करवंदे  अनिल करवंदे ,राजू करवंदे तसेच ईतर अनेक पदाधिकारी उपस्तिथ होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले म्हणाले,” पक्ष नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवताना आनंद होत आहे. धर्मनिरपेक्ष विचारांची कास धरीत सामजिक उपक्रम राबवावे हा अलिखित कार्यकर्ते म्हणून पाळताना आम्हाला मोठे समाधान मिळतेय.
आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश घोजगे म्हणले,” आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गर्शनाखाली ‘अजित स्वाभिमान सप्ताह ‘ साजरा करीत आहोत.ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिना शैक्षणिक साहित्य व  वृक्षारोपण करून दादांचा वाढदिवस साजरा केला. दादांचा,वाढदिवस आम्हाला प्रेरणादायक आहे.

error: Content is protected !!