घोणशेत :
घोणशेत ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सपना चोरघे या एक मताधिक्य मिळवून विजयी झाल्या.घोणशेत ग्रामपंचायतीच्या ७५ वर्षाच्या उपसरपंच लक्ष्मीबाई पालवे यांनी ठरलेल्या कालावधीनुसार त्यांच्या पदाचा राजीनामा दिला,त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली.
उपसरपंच पदासाठी सपना लक्ष्मण चोरघे, मच्छिंद्र बबन कचरे ,योगेश शंकर चोरघे या तीन जणांचे अर्ज दाखल झाले. नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये तीन ही अर्ज वैध ठरवण्यात आले .
अर्ज माघारी घेण्याच्या वेळेमध्ये योगेश चोरघे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे उपसरपंच पदाकरिता  दोन अर्ज शिल्लक राहिल्याने लढत समोरासमोर झाली. यामध्ये सपना चोरघे यांना पाच व मच्छिंद्र कचरे यांना चार मतदान झाले.
सभेचे अध्यक्ष अंकुश खरमारे यांनी उपसरपंच पदी सपना चोरघे या निवडून आल्याचे जाहीर केले. या निवडणूकिसाठी निवडणूक अधिकारी  म्हणून अंकुश खरमारे यांनी काम पाहिले. तर निवडणूक सहाय्यक  ग्रामसेवक गणेश ऐवळे यांनी काम पाहिले.
  माजी सरपंच यदुनाथ चोरघे, माजी उपसरपंच रोहिदास असवले, सदस्य गजानन खरमारे,कविता चोरघे, माजी सरपंच सुरेश चोरघे,कैलास पालवे, माजी सरपंच ज्ञानेश्वर चोरघे,सोमनाथ चोरघे,विश्वास चोरघे, लक्ष्मण चोरघे, महादू चोरघे, बाळासाहेब खरमारे, संतोष मोकाशी, हरिदास चोरघे यासह अन्य  नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!