तळेगाव दाभाडे:
तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता आशांची या कार्यक्रमात आशा वर्कर्स यांचा सन्मान करण्यात आला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसनिमित्त आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यात ‘अजित स्वाभिमान सप्ताह ” साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत आज तळेगाव शहरांमध्ये कृतज्ञता आशांची हा कार्यक्रम घेण्यात आला.”मैत्री संवाद “या थीमवरील या कार्यक्रमात ‘आशा वर्कर्स ‘यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी आशा वर्कर्स यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
राष्ट्रवादीचे तळेगाव शहराध्यक्ष गणेश  काकडे, कुलस्वामिनी मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके ,तालुका अध्यक्षा दीपाली गराडे  प्रमुख पाहुणे म्हणून  होते. व सर्व तळेगाव शहर राष्ट्रवादी कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष शैलजा ताई काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
  मंजू बारणे यांनी सुत्रसंचालन केले .आशा सेविकांनी ही त्यांचे मनोगत व्यक्त केले.तळेगावातील महिला कार्यकारणीतील पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कुलस्वामिनी मंचच्या अध्यक्ष सारिका शेळके म्हणाल्या,”
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत ही माझी आशा सेविका ही समाजातील तळागाळापर्यंत स्वतःची सेवा पोहोचवण्याचं काम हे सातत्याने करत असते. म्हणून तिचा हा सन्मान करताना करताना आनंद होत आहेच. शिवाय तिच्या कामातील प्रामाणिक पणाचा अभिमान ही वाटतो.
शहराध्यक्ष शैलजा काळोखे म्हणाल्या,”
कोरोना सारख्या संकटाला तोंड देत ताठ कण्याने माझी आशा सेविका उभी आहे. अशा सेविकांच्या ऋणातून मुक्त होणे हे अवघड आहे .त्यांचा सन्मान करून त्यांचा कौतुक सोहळा करून दादांचा वाढदिवस साजरा करावा असे आम्हाला वाटले म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केले.
 

error: Content is protected !!