वडगाव मावळ:
  पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला  कॉग्रेसच्या उपाध्यक्ष पदी सुवर्णा राजेश राऊत यांची निवड  निवड करण्यात  आली,पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा भारती शेवाळे यांनी त्यांची नियुक्ती केली.
   मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके,मावळ  तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या  हस्ते राऊत यांना निवडीचे पत्र  देण्यात  आले.राऊत यांनी यापूर्वी मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचेअध्यक्ष पद भूषविले आहे. तसेच त्या येळसे ग्रामपंचायतीचे सदस्य होत्या. सध्या त्या  तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय आहे.
  सुवर्णा राऊत म्हणाल्या,” लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार  साहेब, विरोधी पक्षनेते अजित दादा  पवार,खासदार  सुप्रिया ताई सुळे , विद्याताई चव्हाण प्रदेशाध्यक्षा, वैशाली नागवडे  पुणे जिल्हा विभाग अध्यक्षा ,भारती शेवाळे महिला अध्यक्षा, पुणे जिल्हा आमदार सुनिल  शेळके व सर्वच  पक्षश्रेष्ठींचे मनापासून  आभार   मानते. पक्ष श्रेष्ठीनी जी जबाबदारी  माझ्यावर   दिली आहे .त्या  पदाला मी नक्कीच  न्याय  देण्याचा  प्रयत्न  करेल.

error: Content is protected !!