
वडगाव मावळ:
दु:खाच्या अनेक खस्ता खात आयुष्य जगलेल्या वडगाव मावळ येथील झुंबरबाई दलीचंद सुराणा यांच्या प्रथम पुण्यस्मण निमित्त त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मंदिराच्या कामास देणगी देण्यात आली.
वडगाव मावळ येथील नियोजीत चालू असलेल्या बांधकामासाठी मावळ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय सुराणा यांनी अकरा हजार रुपयाची देणगी देऊन आईच्या स्मृतीला उजाळा दिला.
झुंबरबाई सुराणा या धार्मिक होत्या.त्यांना पाच मुली व दोन मुले असा परिवार होता.त्यातील आपल्या डोळ्यासमोर चार मुली व एक मुला स्वर्गवास झाल्या .हे दुख डोळ्यासमोर असताना पती दलीचंद सुराणा यांचे निधन झाले. घराचा संपूर्ण जबाबदारी या माऊलीवर आली.
आई वडिल अशी दोन्ही जबाबदारी सांभाळत त्यांनी घराला आधार दिला,मुलांच्या संगोपनात कसलीही कसूर न करता त्यांनी मुले घडवली आणि वाढवली. आपल्या प्रत्येकालाच आईच्या प्रेमाची आस ही कायमच असते. ती असतानाही ती माया मिळतेच.पण ती नसतानाही तिच्या स्मृती जपण्यासाठी असे उपक्रम सामजिक तिची आठवणींना उजाळाही देते. आणि प्रेरणा,प्रोत्साहन आणि आशिर्वाद मिळत असल्याच्या भावना पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुराणा यांनी व्यक्त केल्या.
कै.झुंबरबाई धार्मिक स्वभावाच्या होत्या, एक वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले .त्यांच्या जाण्याने घरात पोकळी निर्माण झाली. त्या स्वता धार्मिक होत्या वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज दत्त मंदिरात न चुकता दर्शन घ्यायच्या त्यांना आज वर्ष झाल्याने त्या निमित्ताने दत्त मंदिर बांधकामासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून ११ हजार देणगी दिली.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन


