वडगाव मावळ:
मावळची सुवर्णकन्या कु. हर्षदा शरद गुरुड हिचे आपल्या कर्मभूमीत मोरया प्रतिष्ठान व समस्त वडगांवकर शहरवासीयांच्या वतीने भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली होती.
*संपूर्ण देशाचे, महाराष्ट्रासह गावाचे नाव संपूर्ण जगात पोहचवण्या-या आपल्या वडगाव मावळची सुवर्णकन्या कु. हर्षदा शरद गरूड हिचे तब्बल सात महिन्यांनी विजयी मुद्रेत वडगाव नगरीत आगमन झाले.
मोरया महिला प्रतिष्ठान व समस्त वडगांवकर शहरवासीयांच्या वतीने सुवर्णपदक विजेती कु. हर्षदा गरुड हिचे वडगाव नगरीत भव्य स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मा. ता. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष श्री. बाळासाहेब ढोरे, जि. प. सभापती श्री. बाबुराव आप्पा वायकर, मा. ग्रा. पं सदस्य सुनिलभाऊ चव्हाण, क्रीडा प्रशिक्षक श्री. बिहारीलाल दुबे, रा. काँ. क्रिडा सेल तालुकाध्यक्षा सौ. हर्षदा दुबे, नगराध्यक्ष श्री. मयुरदादा ढोरे, उपनगराध्यक्षा सौ. पुनमताई जाधव, रा काँ. वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. पंढरीनाथ ढोरे, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष श्री. विष्णू शिंदे गुरूजी, नगरसेवक श्री. राजेंद्र कुडे, श्री. राहुल ढोरे, श्री. चंद्रजीत वाघमारे, श्री. प्रविण चव्हाण, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. अबोली ढोरे, उपाध्यक्षा सौ. चेतना ढोरे, हर्षदा गरूड चे वडील श्री. शरदभाऊ गरूड, आई सौ. रेखाताई गरूड, नगरसेविका सौ. माया चव्हाण, सौ. प्रमिला बाफना, सौ. पुजा वाहिले, श्री. आबा चव्हाण, मा. उपसरपंच श्री  अविनाश चव्हाण, उद्योजक श्री. राजेश बाफना, व्याख्याते श्री. विवेक गुरव, युवक अध्यक्ष श्री. अतुल वायकर, ओबीसी सेल अध्यक्ष श्री. अतुल राऊत, श्री. मंगेश खैरे, श्री  युवराज ढोरे, कार्याध्यक्ष श्री. सुरेश जांभुळकर, श्री. नितीन चव्हाण, श्री. संतोष चव्हाण, श्री  शरद ढोरे, श्री. सुहास वायकर, श्री. संदीप ढोरे, श्री. सोमनाथ धोंगडे, श्री.ज्ञहर्षद ढोरे, श्री. विशाल वहिले, श्री. अफताफ सय्यद, श्री. विकी भोसले, श्री. सिद्धेश ढोरे, श्री. गणेश ढोरे आणि शहरातील सह्याद्री जिमखाना, दुबेज गुरूकुल, फ्रेंड्स जिमखाना, महाराष्ट्र जिमखाना, आर फिटनेस जिम, सर्योदय जिम मधील युवा खेळाडू, शहरातील नागरिक, रा. काँ.  पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका आणि क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडगाव शहरातील दुबेज गुरूकुल जिमखान्याची खेळाडू हर्षदाने मे महिन्यात ग्रीस येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या ज्युनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेत देखील हर्षदाने आपल्या वडगाव शहराचा अटकेपार झेंडा फडकवला आहे.

error: Content is protected !!