मावळच्या सुवर्ण कन्येचा पुन्हा एकदा अटकेपार सुवर्णवेध
ज्युनिअर एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२ .स्पर्धेत हर्षदा गरूडला  सुवर्णपदक :  मावळ तालूका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हर्षदाचा सन्मान
वडगाव मावळ:
एशियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताची जागतिक सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर वडगांव मावळची हर्षदा गरुड हिने पुन्हा एकदा आपले वेटलिफटिंग मधील निर्विवाद वर्चस्व सिध्द केले.
.ताशकंद येथे झालेल्या ज्युनिअर एशियन वेटलिफटिंग चॅम्पियनशिप  स्पर्धेत ४५  किलो वजनी गटात हर्षदाने स्नॅच प्रकारात ६९  किलो व क्लीन आणि जर्क प्रकारात ८८ किलो असे एकूण १५७   किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक मिळविले.
हर्षदाच्या या यशाबद्दल तिचे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश खांडगे व तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे यांच्या हस्ते हर्षदाचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक बिहारीलाल दुबे,शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या हर्षदा जोशी दुबे,हर्षदा गरूडचे वडील शरद गरूड आई रेखा गरुड उपस्थित होते.
वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुल ची खेळाडू हर्षदाने मे महिन्यात ग्रिस येथे झालेल्या जागतीक वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून, हे पदक मिळविणारी भारतातील पहिली महिला होण्याचा मान मिळविला होता .
ताशकंद येथे सुरू असलेल्या एशियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून तिने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यात यश मिळविले .सध्या ती पतियाळा येथील इंडिया कॅम्प मधे सराव करत आहे.येणाऱ्या भविष्यकाळात हर्षदा भारतीय वेटलिफ्टींग मधे इतिहास निर्माण करेल असा विश्वास  तिचे गुरू  बिहरीलाल दुबे यांनी व्यक्त केली.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. हर्षदाच्या यशात तिचे गुरू आणि आई वडील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे खांडगे म्हणाले.

error: Content is protected !!